लोकमत न्यूज नेटवर्कपालांदूर : वैशाखचा वाढता उकाडा असह्य होत असून ग्राहकांकडून पाणीदार फळांची मागणी वाढली आहे. उकाड्यामुळे घशाला कोरड पडत असल्याने टरबूज,डांगर,काकडी यांसारख्या फळांची मागणी ग्राहकांकडून होत असल्याने बाजारात टरबूजाचे दर वाढले आहेत. ४० ते ५० रुपयात मिळणारे टरबूज आता १०० ते १३० रुपयांवर पोहचले आहेत.पवित्र रमजान महिणा सुरु झाल्याने शित व पाणीदार फळांच्या विक्रीत वाढ झाली आहे. अनेकजण उपवास सोडताना टरबूज, डांगर, जांबी या फळाचा उपयोग करतात. वैनगंगा नदीपात्राच्या शेतातील अनेक शेतकऱ्यांनी टरबूजाची शेती केली आहे. तीन महिण्यांतच फळे विक्रीला येत असल्याने शेतकºयांचा या पिकाकडे कल वाढतो आहे. जिल्ह्यातील टरबूज, डांगर, जांबी ग्राहक मोठ्या संख्येने खरेदी करताना दिसतात. शरीरातील पाण्याची कमतरता कमी होऊ नये व अन्नाची गरज पण भागावी या दुहेरी हेतूने टरबूज फळाला मोठी मागणी वाढत आहे. सामान्य ग्राहक सुध्दा टरबूज खरेदी करत असल्याने शेतकºयांना व्यापाºयाकडूनही चांगले दर मिळत आहेत. वर्षभर राबूनही धानपिकातून अपेक्षित उत्पन्न मिळत नसल्याने शेतकºयांना कमी खर्चात जास्त उत्प न्न मिळवून देणारे टरबूज फायदेशीर ठरत आहे.ग्राहकांनाही १ ते २ किलोपासून ते ६ ते ८ किलो वजनाएवढे टरबूज वेगवेगळ्या भावात विक्रीला उपलब्ध आहेत. मात्र तापमानाचा पारा वाढत चालल्याने वाढत्या मागणीमुळे दर दप्ुपट झाले आहेत. जिल्ह्यात असणाºया अल्पभूधारक शेतकºयांची संख्या विचारात घेता टरबूज पिकातून चांगले उत्पन्न शेतकºयांना मिळत आहे.टरबूजाचा हंगाम जून अखेर पर्यंत चालेल. वाढत्या मागणीसोबत भाव वाढ अपेक्षित आहे. ३ ते ४ रुपये किलोपासून टरबूजचे दर १२ ते १५ रुपये एवढे वाढले आहेत. वाढत्या उष्णतेमुळे टरबूज खराब होण्याची शक्यता असते त्याचा विचार करुनच टरबूज विकावा लागतो. सामान्यत: २० रुपयापासून तर १५० रुपयापर्यंत टरबूज विक्री करावी लागते.- शामराव सोनकुसरे टरबूज व्यापारी पालांदूर /चौ.जानेवारी महिन्यात एक एकरात टरबूजाची लागवड केली. पहिलेच वर्ष असल्याने अपेक्षीत नफा जास्त मिळाला नसला तरी धानपिकापेक्षा नक्कीच फायदेशीर उत्पन्न मिळाले.एप्रिल महिन्यातच माल काढणीला आल्याने कमी दर मिळाला हेच जर मे महिण्यात विक्रीला आले असते तर जास्त नफा मिळाला असता.जिल्ह्यात धानपिकाला टरबूज पिक नक्कीच उत्तम पर्याय शेतकºयांसाठी ठरु शकते.- शिवाजी कोरे, शेतकरी पाथरी
वाढत्या तापमानाने जिल्ह्यात टरबूजाचे दर वधारले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2019 10:11 PM
वैशाखचा वाढता उकाडा असह्य होत असून ग्राहकांकडून पाणीदार फळांची मागणी वाढली आहे. उकाड्यामुळे घशाला कोरड पडत असल्याने टरबूज,डांगर,काकडी यांसारख्या फळांची मागणी ग्राहकांकडून होत असल्याने बाजारात टरबूजाचे दर वाढले आहेत. ४० ते ५० रुपयात मिळणारे टरबूज आता १०० ते १३० रुपयांवर पोहचले आहेत.
ठळक मुद्देग्राहकांडून मागणी वाढली :शेतकऱ्यांसाठी टरबूज शेती ठरतेय फायदेशीर