लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : भाजप- सेना युती सरकारने मागील पाच वर्षात लोकाभिमुख योजना राबविल्या आहेत. या योजनांचा खऱ्या अर्थाने शेवटच्या घटकापर्यंत लाभ मिळाला पाहिजे. यासाठी लाभार्थ्यांपर्यंत या योजना पोहचवा, असे जाहिर आवाहन हजारो भाजप कार्यकर्त्यांना आमदार चरण वाघमारे यांनी केले.तुमसरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणात तुमसर-मोहाडी विधानसभाक्षेत्रातील नागरिकांना योजनाची माहिती व लाभ देण्याअंतर्गत मार्गदर्शन करण्यासाठी संकल्प सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार वाघमारे बोलत होते.यावेळी मंचावर माजी खासदार शिशुपाल पटले, भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रदीप पडोळे, डॉ. युवराज जमईवार, माजी सभापती गिता कापगते, बाजार समितीचे सभापती भाऊराव तुमसरे, मुन्ना पुंडे, बाबु ठवकर, अनिल जिभकाटे, राजेश पटले, संदिप ताले, डॉ. हरेंद्र रहांगडाले, निशिकांत इलमे, डॉ. अशोक पटले आदी मान्यवर उपस्थित होते.वाघमारे म्हणाले, यापुर्वीच्या राज्य शासनाने कधी सर्वसामान्य मानसांचा विचार केला नाही. भारतीय जनता पक्षाचे संस्थापक पं. दिनदयाल उपाध्याय यांच्या संकल्पनेतून एकात्म मानववादाचा विचार शेवटचा घटकापर्यंत पोहचविण्यासाठी त्यांनी सदैव प्रयत्न केले. हाच संकल्प मनाशी बाळगून मुख्यमंत्री फडणवीस कार्य करीत आहेत. मागील पाच वर्षाचा कार्यकाळात शेतकरी कर्जमाफी, सुवर्ण कर्जमाफी, जलयुक्त शिवार, पिक विमा योजना, वर्ग दोन ची शेतजमीन वर्ग १ करण्याचा निर्णय, सरळसेवा भरती, सेवा हमी कायदा, महिलांना संरक्षण, अशा अनेक योजना राज्य शासनाने राबविल्या आहेत. परंतु त्या योजना खºया अर्थाने लाभार्थ्यांपर्यंत पोहचविण्याची जबाबदारी भाजप कार्यकर्त्यांची आहे, असेही ते म्हणाले. यावेळी माजी खासदार शिशुपाल पटले यांनी केंद्र शासनाच्या अर्थसंकल्पावर जोरदार टिका केली. गीता कापगते यांनी महिलांना मार्गदर्शन केले.यावेळी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक डॉ. युवराज जमईवार यांनी तर आभार अशोक पटले यांनी मानले.
शासनाच्या विविध योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहचवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2019 1:04 AM
भाजप- सेना युती सरकारने मागील पाच वर्षात लोकाभिमुख योजना राबविल्या आहेत. या योजनांचा खऱ्या अर्थाने शेवटच्या घटकापर्यंत लाभ मिळाला पाहिजे. यासाठी लाभार्थ्यांपर्यंत या योजना पोहचवा, असे जाहिर आवाहन हजारो भाजप कार्यकर्त्यांना आमदार चरण वाघमारे यांनी केले.
ठळक मुद्देचरण वाघमारे : तुमसर येथे संकल्प सभा