बॉक्स
कोरोना रुग्णांना, नातेवाईकांना धीर द्या
आपल्या घराजवळ एखादा कोरोना रुग्ण आढळल्यास त्याचे खच्चीकरण करू नका तर कोणी कोरोना पॉझिटिव्ह सापडल्यास त्वरित आपल्या जवळच्या आरोग्य केंद्रात न्या, त्याची तपासणी करून घ्या, कोरोनामुळे कोणी आजारी असेल तर त्याला हिणवू नका, त्याला हिम्मत द्या आधार देत आपल्याला शक्य तेवढी मदत करता येईल तेवढी मदत करा शासनाची मदत घ्या. शासनाचे प्रत्येक अधिकारी, कर्मचारी आज कोरोना संकटात काम करत आहेत. त्यांना सहकार्य करावे असेही यावेळी सांगितले.
बॉक्स
लसीबाबतचा असलेला गैरसमज दूर करा
ग्रामीण भागातील कोरोना लसीबाबतचा असलेला गैरसमज दूर करण्यासामहिला बचत गटांतील प्रत्येक सदस्याने पुढे यावे. कोविड काळातील शासनाच्या सूचनांचे पालन करावे. महिला संघटन शक्तींनी विचाराने एकत्र येऊन समाजातील गरजूंना मदतीसाठी महिला बचत गटांचा सहभाग दिसून येतो. मात्र, याचे प्रमाण अजूनही वाढविले पाहिजे. आज कोविडच्या प्रादुर्भावामुळे अनेकांना अडचणींचा सामना आपणास करावा लागत आहेत. प्रत्येकाने कोरोना लस टोचून घ्यावी, ग्रामीण भागातील लसीबाबतचा असलेला गैरसमज दूर करण्यासाठी महिला बचतगटांनी व लोकसंचलित साधन केंद्रांनी यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी प्रदीप काठोळे यांनी केले आहे.