विठ्ठल साठवणे (४८) साेमा चाेपकर (४७), सुरेश बावणकर (३८) सर्व रा. नांदेड ता. लाखांदूर अशी आराेपींची नावे आहे. माेहन लिल्हारे यांच्या भावाने नांदेड येथील रेतीघाट २ काेटी ९४ हजारात घेतला. १३ एप्रिलपासून या घाटावरून रेतीचे नियमानुसार उत्खनन करण्यात येते. सर्व माेहन लिल्हारे सांभाळतात. घाटातील रेती राॅयल्टीच्या माध्यमातून नागपूर व आजूबाजूच्या परिसरात विकली जाते. या तिघांनी या घाटातून जाणाऱ्या रेतीच्या ट्रकला यापुढे अडविले हाेते. त्यावेळी त्यांना पैसे दिले हाेते. अनेकदा हे तिघे ट्रक थांबवून पैशांची मागणी करतात. पैसे न दिल्यास घाटावरील ऑफीस, पाेकलँड, जेसीबी जाळून टाकण्याची धमकी देतात. नेहमीच्या प्रकाराला कंटाळून माेहन लिल्हारे, रा. मानेवाडा नागपूर यांनी लाखांदूर ठाण्यात तक्रार दिली. त्यावरुन तिघाविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.
रेती घाटावर वसुली, तिघांवर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2021 4:38 AM