आॅनलाईन लोकमतभंडारा : शिक्षक भरती करणे हा संस्था संचालकांचा अधिकार आहे, हे संस्था संचालकांनी जाणून घेतले पाहिजे. समायोजन प्रक्रियेवर सर्वोच्च न्यायालयात निकाल महामंडळाच्या बाजूने लागला असून संस्था संचालकांनी समायोजन घेऊ नये, असे प्रतिपादन महामंडळाचे महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था कार्याध्यक्ष विनोद गुडधे पाटील यांनी केले.राज्य सरकारच्या शिक्षण विषयक धोरण, पद भरती, चुकीच्या संच मान्यता, राजकीय दबावाखाली शिक्षणाधिकारी कार्यालयातुन होणारे गैरव्यवहार, अतिरिक्त कामाचा बोझा, आॅनलाईनचा शिक्षकांना होणार त्रास, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या भरती बंदीचा प्रश्न तसेच संस्था संचालकांच्या अडचणीवर सरकार दरबारी तोडगा काढण्याच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्र राज्य संस्था संचालक महामंडळ शाखा भंडाराच्या वतीने बैठकीचे आयोजन जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सभागृहात करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते. बैठकीला महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळ महासचिव रविंद्र फडणविस , विभागीय अध्यक्ष अनिल शिंदे, महासंघ सदस्य चंद्रकांत जवदंड, महासंघ शाखा भंडारा अध्यक्ष कैलाश नशिने, सचिव भाऊ गोस्वामी प्रामुख्याने उपस्थित होते.रवींद्र फडणवीस म्हणाले, राज्य शासनाने डी एड, बी. एड. उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा कल कोणत्या क्षेत्रात आहे हे सिद्ध करण्यासाठी अभियोग्यता चाचणी घेण्याचा निर्णय घेतला आहे. विद्यार्थ्यांनी प्रवेश जर डी. एड., बी. एड. ला घेतला तर मग त्याला निश्चितच शिक्षक व्हायचे आहे. मग ते उत्तीर्ण झाल्यावर या शिक्षक क्षेत्रात करिअर करायचंय आहे. म्हणून ही चुकीच्या पद्धतीने काढलेल्या अभियोग्यता चाचणीला आमचा विरोध आहे, असे असले तरी या अभियोग्यता चाचणीमध्ये विषयाचे ज्ञान किती आहे हे मात्र बघितले जाणार नाही. मग शासन असे थट्टा करून मराठी शाळांवर वारंवार अन्याय करीत असल्याची टीका त्यांनी केली.अभियोग्यता चाचणी संदर्भात महाराष्ट्र शिक्षण संस्था महामंडळ उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून संस्था संचालकांना पद भरतीचे अधिकार मिळाले असून महामंडळाची परवानगी घेऊन जाहिराती काढाव्यात, असे महामंडळाचे विभागीय अध्यक्ष अनिल शिंदे बोलत होते.यावेळी कैलाश नशीने आणि भाऊ गोस्वामी यांनी मार्गदर्शन करून संस्था संचालकांना संघटित होण्याचे आवाहन केले. यावेळी हेमंत बांडेबुचे, आल्हाद लाखनीकर, दिगंबर मेश्राम, मंसाराम दहिवले, प्रभुदयाल चौधरी, अन्नाजी फटे, देवराम पवनकर, सुभाष खेडीकर, पुरुषोत्तम करेमोरे, बाबुराव फूले,चंद्रकांत दिवटे, अमोल हलमारे, दिलीप जयस्वाल, अनंत डुंभरे आदी मोठ्या संख्येने संस्था संचालक उपस्थित होते.बैठकीचे प्रस्ताविक निश्चय डोनाडकर यांनी केले. संचालन अजिंक्य भांडारकर व आभार प्रदर्शन आल्हाद लाखनीकर यांनी केले. यावेळी जिल्ह्यातील बहुतांश संस्था संचालक प्रामुख्याने उपस्थित होते.