विनिता साहू : विर्शी येथे फिरते पोलीस स्टेशन कार्यक्रमसाकोली : ग्रामीण भागातील महिला ज्येष्ठ नागरिक, अपंग व्यक्ती, मुली यांना समस्यांना तोंड द्यावे लागते व हे गाव पोलीस ठाणे पासून लांब असल्यामुळे हे लोक पोलीस स्टेशन पर्यंत पोहचू शकत नाही. म्हणून त्यांना न्याय मिळावा व पोलिसांबद्दलची भीती कमी व्हावी याकरिता आपल्याच गावी फिरतो पोलीस स्टेशन आलेले आहे. त्याच ठिकाणी तक्रार नोंदवून न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला जाईल. असे प्रतिपादन पोलीस जिल्हा अधीक्षक वनिता साहू यांनी केले. विर्शी येथील ग्रामपंचायतच्या आवारात आयोजित फिरते पोलीस स्टेशन या कार्यक्रमाप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी मंचावर अप्पर पोलीस अधीक्षक रश्मी नांदेडकर, उपविभागीय पोलीस अधिकारी मोहनदास संखे, तहसीलदार खडतकर, पोलिस निरिक्षक जगदीश गायकवाड, डी.जी. रंगारी, सुनिल जागीया, तलाठी सुनिता सावरबांधे, सरपंच निमराज कापगते, उपसरपंच अण्णा टेंभुर्णे, तंटामुक्त अध्यक्ष जनाबाई लांजेवार, गोपीचंद कोल्हे, नायब तहसीलदार मोरे आदी उपस्थित होते.उपविभागीय पोलीस अधिकारी मोहनदास संखे यांनी म्हणाले, प्रत्येक शनिवारी फिरते पोलीस स्टेशन तालुक्यात प्रत्येक गावात येणार असून तिथेच ाअपल्या तक्रारी नोंदवाव्यात. न्याय देण्यात येईल. पोलीस व जनता यांचा दुरावा कमी व्हावा, जनता व पोलीस मित्र करावे हीच संकल्पा असून ती प्रभावीपणे राबवावी असे मत व्यक्त केले. अप्पर पोलीस अधीक्षक लक्ष्मी नांदेडकर यांनी सांगितले की नाविण्यपूर्ण संकल्पना असून महाराष्ट्रातील पहिलाच प्रयोग भंडारा जिल्ह्यात पोलीस स्टेशन आपल्या दारी असल्यामुळे जनतेनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले. पोलीस निरीक्षक जगदीश गायकवाड यांनी प्रस्तावनेत सांगितले की, पोलीस हा तुमचा मित्र आहे. समजून न घाबरता तुमच्या ज्या काही तक्रारी आहेत जे पोलीस स्टेशनपर्यंत येऊ शकत नाही. याकरिता विशेष करून महिलांकरिता पोलीस स्टेशन आपल्या गावी आहे याचा फायदा घ्यावा. संचालन पोलीस हवालदार छगन बावनकुळे यांनी केले तर आभार पोलीस निरीक्षक जगदीश गायकवाड यांनी मानले. या कार्यक्रमाकरिता विर्शी, उकारा या परिसरातील जनता, सरपंच, पोलीस पाटील, उपसरपंच, तंटामुक्त अध्यक्ष व महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाकरिता पोलिस उपनिरीक्षक रेवतकर, सहाय्यक से.नि. राजन गोडंगे, रविंद्र मडावी, वसंता डोंगरवार, पोलीस हवालदार ग्यानीराम गोन्नाडे, संजय पाटील, पुरुषोत्तम भुतांगे, स्वप्नील भजनकर, पोलीस शिपाई मिलींद बोरकर, भूपेंद्र गोस्वामी, राकेश पटले, नरेंद्र झलके, संगीता मडावी, उमेश्वरी नागेरकर, आशू खंडारे, सविता पटले व बहुसंख्य पोलीस कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. (तालुका प्रतिनिधी)
पोलिसांबद्दलची भीती कमी व्हावी
By admin | Published: February 06, 2017 12:21 AM