लाखनी : सर्वसामान्यांना अच्छे दिनाचे स्वप्न दाखवून पेट्रोल व डिझेलचे दर ३० ते ४० रुपयांपर्यंत आणण्याचे गाजर दाखविणाऱ्या केंद्र शासनाने मागील सात वर्षांत पेट्रोल, डिझेल व गॅसच्या दरात सातत्याने भाववाढ केलेली आहे. दररोज पेट्रोल, डिझेल व गॅसच्या किमती गगनभरारी घेत आहेत. संपूर्ण भारत देशातील गरीब शेतकरी, शेतमजूर, व्यापारी व सर्वसामान्यांमध्ये रोजच्या दरवाढीमुळे केंद्र शासनाबाबत असंतोष निर्माण झालेला आहे. केंद्र शासनाच्या पेट्रोल, डिझेल व गॅसवर केलेल्या दरवाढीमुळे महाराष्ट्रातीलच नव्हे तर संपूर्ण देशातील सर्वसामान्यांची सर्रास लूट सुरू आहे.
केंद्र शासनाने पेट्रोल, डिझेल व गॅसवर केलेली भाववाढ त्वरित कमी करावी. अन्यथा राष्ट्रवादी युवक काँग्रेस लाखणी तालुका व शहरतर्फे तीव्र जन आंदोलन करून केंद्र शासनाचा निषेध करण्यात येईल, या आशयाचे निवेदन राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे तहसीलदार यांच्यामार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी व पेट्रोलियममंत्री धर्मेंद्र प्रधान यांना राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष डॉ. विकास गभने, कामगार सेलचे जिल्हाध्यक्ष नरेश इलमकर, राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष धनू व्यास, ओबीसी सेलचे तालुकाध्यक्ष नागेश पाटील वाघाये, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष जितेंद्र बोंद्रे, शहराध्यक्ष अरमान धरमसारे यांच्या नेतृत्वात देण्यात आले. याप्रसंगी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा महासचिव नीलेश गाढवे, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस तालुकाध्यक्ष रोहित साखरे, कमलेश अंबुले, अमित सरोदे, अश्विन फाये, सुनील बर्वे, प्रणय श्यामकुवर, रामकृष्ण गिरीपुंजे, दीपक ठाकरे, मयूर वंजारी, पंकज खेडीकर, धनराज बागडे, शरद गभने, शैलेश गायधनी व कार्यकर्ते उपस्थित होते.