पूर्ण देश लॉकडाऊन, बेरोजगारी, शेतकरी आंदोलन यासारख्या प्रश्नांना सामोरे जात आहे. याउपरही सरकार सतत पेट्रोल-डिझेलच्या किमती किमतीमध्ये वाढ करत आहे. जिथे लोकांना दोन वेळचे जेवण भेटणे कठीण झाले असून इंधनाची दरवाढ डोकेदुखी ठरत आहे. भाजीपाला महाग होत आहे. धान्य महाग होत आहे, असे वाटतेय की केंद्र सरकार जबरदस्तीने देशातील लोकांचे खिसे खाली करू पाहत आहे. आर्थिक कमजोर करू पाहत असल्याचा आरोप निवेदनात नमूद आहे. केंद्र सरकारला जर लवकरात लवकर पेट्रोल आणि डिझेल दर कमी केले नाही तर पूर्ण देशांमध्ये एक जनआंदोलन उभा होईल, असा इशारा वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. शिष्टमंडळात जिल्हाध्यक्ष सुरेश खंगार, महासचिव दिगंबर रामटेके, धनपाल गडपायले, अरविंद गोस्वामी, सोमेंद्र शहारे, शैलेश राहुल, सर्विन शेंडे, राधेश्याम कावडे, नरेंद्र बनसोड उपस्थित होते.
पेट्रोल़, डिझेल दरवाढ कमी करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 08, 2021 5:53 AM