सहारा इंडिया ठेवीदारांना रकमेचा परतावा देण्यास संवेदनशील दिसत नाही. गुंतवणूक खातेदारांकडे सहारा दुर्लक्ष करीत आहे. यासंदर्भात शिवसेनेकडून सहारा इंडियाच्या सेक्टर प्रबंधकांना निवेदनातून दहा दिवसांत कालावधी पूर्ण झालेल्या गुंतवणूकदारांच्या रकमेचा परतावा परत न केल्यास सहारा इंडिया वरिष्ठ कार्यालयाच्या अधिकाऱ्यांविरोधात आर्थिक फसवणुकीचा गुन्हा नोंदविण्यात येईल, असे सांगण्यात आले होते. शिवसेनेच्या माध्यमातून पीडित खातेदारांचे हित लक्षात घेऊन सहारा इंडिया, तुमसर कार्यालयाच्या आवारात एकदिवसीय आंदोलन केले जाईल. यामध्ये कोणतेही नुकसान झाल्यास स्वतः सहारा इंडिया जबाबदार राहील, असे निवेदन सहारा इंडियाचे सेक्टर प्रबंधक भंडारा यांना देण्यात आले आहे. याबाबतचे पत्र तहसीलदार तुमसर, पोलीस निरीक्षक तुमसर यांना देण्यात आले आहे. निवेदन देताना शिवसेनेचे अमित एच. मेश्राम, संघटक जगदीश त्रिभुवनकर, शाखा प्रमुख निखिल कटारे, तुषार लांजेवार, अरुण डांगरे, चिंटू चोपकर, महेंद्र गभने, हेमंत नवखरे यांच्यासह गुंतवणूकदार उपस्थित होते.
सहारा इंडिया तुमसर शाखेतील खातेदारांच्या रकमेचा परतावा करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 4:43 AM