निवेदनात, कोविड काळातील शिक्षकांच्या रजा विशेष रजा म्हणून मंजूर करण्यात याव्यात, जुनी पेन्शन योजना लागू करावी, शिक्षकांची रिक्त पदे त्वरित भरण्यात यावीत, केंद्राप्रमाणे जुलै २०२१ पासून २८ टक्के दराने महागाई भत्ता देण्यात यावा, सातव्या वेतन आयोगाच्या थकबाकीचा दुसरा व तिसरा हप्ता देण्यात यावा, जानेवारी १९ ते ३० जून १९ या सहा महिन्यांच्या महागाई भत्त्याची थकबाकी देण्यात यावी, जुलै १९ ते नोव्हेंबर १९ या पाच महिन्यांच्या ५ टक्के महागाई भत्त्याची थकबाकी आदेश निर्गमित करावे, परीक्षा रद्द झाल्याने विद्यार्थ्यांचे पैसे परत करावे अशी मागणी निवेदनातून केली आहे. शिष्टमंडळात राज्य कार्यकारिणी सदस्य अरुण पारधी, तालुका संयोजक अरुण मोखारे, सहसंयोजक जितेंद्र नागपूरे, कन्हैयालाल पटले, ज्योती समरीत, जयंत पंचबुधे, विजय केवट, प्रवीण डोंगरे, संतोष पाठक, मोरेश्वर कहालकर, नामदेव कापगते आदी उपस्थित होते.
विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क परत करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 07, 2021 4:42 AM