लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : लाखनी तालुक्यातील रेंगेपार (कोहळी) येथील वृक्ष मित्र मंडळ व कापगते यांना वृक्षपट्टा योजनेतून शासकीय जागा देण्यात आली. परंतु, या दोघांनी सामाजिक विभागाच्या अटी व शर्र्थींचे उल्लंघन केले. त्यामुळे ही जागा शासन जमा करण्यात यावी, असा चौकशी अहवाल आहे. परंतु, सामाजिक वनीकरण विभागाचे अधिकारी कारवाईसाठी टाळाटाळ करीत आहेत. कारवाई न झाल्यास उपोषण करण्यात येईल, असा इशारा तंटामुक्त गाव समिती रेंगेपारचे अध्यक्ष विनायक मुंगमोडे यांनी पत्रपरिषदेत दिला.जिल्हास्तरीय सहनियंत्रण समितीने सन १९९२ मध्ये शासन निर्णयानुसार रेंगेपार (कोहळी) येथील वृक्षमित्र मंडळाला आठ हेक्टर व रेवताबाई कापगते यांना दोन हेक्टर जागा सुधारित वृक्षपट्टा योजनेसाठी ३० वर्षासाठी कालावधीसाठी नाममात्र भाडेतत्वावर देण्यात आली आहे. त्यासाठी सामाजिक वनविभागाने लाभार्थ्यांसोबत करार करून या जागेवर रोपे लावली आहेत.भाडेपट्टयाने दिलेल्या जागेवर कोणतेही बांधकाम न करणे, दुसऱ्यांना हस्तांतरण न करणे अशा २७ अटी या करारात आहेत. परंतु, लाभधारकांनी या विभागाला विश्वासात न घेता मातोश्री गोशाळेला नियमबाह्य करारनामा करून कराराचा भंग केला. रेवताबाई कापगते यांनी शेडचे पक्के बांधकाम केले आहे. त्यामुळे शासनाच्या योजनेच्या लाभार्थ्यांना विभागाच्या कराराचे उल्लंघन केल्याची तक्रार गावकºयांनी सामाजिक वनीकरण विभागाला केली. त्यावर परिक्षेत्र अधिकारी व जिल्हास्तरावर चौकशी करण्यात आली. यात चौकशी अधिकाºयांनी दोन्ही लाभार्थ्यांनी कराराचा भंग केल्यामुळे ही जागा शासनजमा करण्यात यावी, असा अहवाल विभागाच्या वरिष्ठ अधिकाºयांना सादर करण्यात आला.परंतु, आठ महिन्यांचा कालावधी होऊनही त्यावर विभागाने कोणतीही कार्यवाही केलेली नाही. याबाबत संबंधित अधिकाºयांना विचारले असता त्यांच्याकडून टाळाटाळ करण्यात येत आहे. या दोन्ही लाभार्थ्यांना दिलेली जागा शासनजमा करण्याची कारवाई झाली नाही तर, सामूहिक उपोषण करण्यात येईल, असा इशारा दिला आहे. यावेळी शालिक बोरकर, सुनिल बोरकर, तुळशिदास चौधरी, सूर्यभान नंदेश्वर उपस्थित होते.उत्पादन मात्र शून्यया दोन्ही संस्थांना भाडेतत्वावर जागा देऊन वृक्षारोपण करण्यात आले. त्याचवेळी सामाजिक वन विभागाने ग्रामपंचायतीच्या जागेवर रोपे लावली. सध्या ग्रामपंचायतीच्या रोपवनाचे मुल्यांकन अंदाजे तीन कोटी रूपये एवढे आहे. परंतु, लाभार्थ्यांनी त्यांच्या जागेतून ७० हजार रूपयांचे उत्पादन दाखविले, असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
भाडेपट्टीची जागा शासनजमा करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 08, 2018 10:08 PM
लाखनी तालुक्यातील रेंगेपार (कोहळी) येथील वृक्ष मित्र मंडळ व कापगते यांना वृक्षपट्टा योजनेतून शासकीय जागा देण्यात आली. परंतु, या दोघांनी सामाजिक विभागाच्या अटी व शर्र्थींचे उल्लंघन केले. त्यामुळे ही जागा शासन जमा करण्यात यावी, असा चौकशी अहवाल आहे.
ठळक मुद्देकारवाईसाठी टाळाटाळ : ग्रामस्थांचा उपोषणाचा इशारा