शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री होताच हेमंत सोरेन यांचा मोठा निर्णय, 'मैया सन्मान योजने'संदर्भात मोठी घोषणा
2
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
3
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
4
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
5
इस्रायलनं काही तासांतच केलं युद्धविरामाचं उल्लंघन? लेबनानमध्ये हिजबुल्लाहच्या ठिकाणावर केला मोठा हवाई हल्ला
6
Killer Cat: पाळलेल्या मांजरीच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू; पत्नी म्हणते...
7
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
8
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
9
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
10
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
11
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
12
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
13
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
14
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
15
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
16
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
17
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
18
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
19
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
20
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."

जादा शुल्क घेणाऱ्या सहा सेतू केंद्रांची नोंदणी रद्द

By admin | Published: June 16, 2017 12:23 AM

येथील सेतू सेवा केंद्रात विविध प्रमाणपत्रांसाठी नागरिक तसेच विद्यार्थ्यांकडून अतिरिक्त शुल्क आकारणाऱ्या सहा सेतू केंद्राची नोंदणी

जिल्हाधिकाऱ्यांची माहिती : तक्रार निवारणासाठी १०७७ क्रमांकावर संपर्क साधालोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : येथील सेतू सेवा केंद्रात विविध प्रमाणपत्रांसाठी नागरिक तसेच विद्यार्थ्यांकडून अतिरिक्त शुल्क आकारणाऱ्या सहा सेतू केंद्राची नोंदणी तहसीलदार संजय पवार यांनी आज रद्द केली आहे. सेतू सेवा केंद्रात अतिरिक्त शुल्क आकारल्या जात असल्याच्या तक्रारी जिल्हाधिकारी तसेच तहसीलदार यांना प्राप्त झाल्या. त्या अनुषंगाने भंडारा तालुक्यातील सेतू सेवा केंद्राची नायब तहसीलदार यांच्या मार्फत चौकशी केली. चौकशी अहवाल भंडारा तहसीलदार यांना प्राप्त झाला असून सहा सेतू केंद्रामध्ये तयार करण्यात येणाऱ्या दाखल्यांकरिता लागणाऱ्या दराबाबत माहिती दर्शविणारे दर फलक लावण्यात आले नाही. तसेच सुविधा केंद्रामध्ये शासकीय दरापेक्षा जास्त रक्कम २०० ते ३०० रुपये अर्जदारांकडून घेतली जात असल्याचे चौकशीत निदर्शनास आले.यावरून ममता चरडे गणेशपूर, प्रवीण पत्तेवार ओम बुक डेपो शास्त्री नगर भंडारा, मोहम्मद सर्फराज नवाज, पटेल मेडीकल टिळक वॉर्ड, भंडारा, वसंत काकडे राजीव गांधी चौक भंडारा, प्रियंका जोशी काशी किराणा स्टोर्स भंडारा, सेतू केंद्र कोचे गॅस गोडाऊनजवळ खोकरला या सहा केंद्राची नोंदणी तहसीलदार भंडारा यांनी रद्द केली आहे.नागरिकांना लागणाऱ्या विविध दाखल्यांसाठी प्रशासनाने सेतू सेवा केंद्राची निर्मिती केली असून या सेतू सेवा केंद्रात प्रत्येक दाखल्यासाठी किती पैसे आकारले जातात. या माहितीचा ८/४ चा दर फलक प्रत्येक सेतू केंद्रावर लावावा, अशा सूचना जिल्हाधिकारी भंडारा यांनी दिल्या आहेत. वय, राष्ट्रीयत्व आणि डोमोसाईल प्रमाणपत्रासाठी ३३ रुपये, वरिष्ठ नागरिक प्रमाणपत्र ३३ रुपये, निवासी दाखला ३३ रुपये, उत्पन्नाचा दाखला ३३ रुपये, सातबारा २३ रुपये, आठ अ २३ रुपये, जात प्रमाणपत्र ५६ रुपये, नॉन क्रिमिलीअर ५६ रुपये आणि नॉन क्रिमिलीयर रिनीव्हल ३३ रुपये असे शासनाचे दर आहेत. या व्यतिरिक्त कुठलेही शुल्क नागरिकांनी अदा करू नये. सेतू केंद्रात यापेक्षा जास्त शुल्क मागितल्यास तहसील कार्यालय ०७१८४-२५२२१० व जिल्हाधिकारी कार्यालय येथील १०७७ या टोल फ्री क्रमांकावर तक्रार नोंदवावी, असे आवाहन तहसीलदार संजय पवार यांनी केले आहे. जिल्ह्यातील कुठल्याही सेतू केंद्रावर निर्धारित दरापेक्षा अधिकचे शुल्क न आकारण्याच्या सूचना जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी दिल्या असून असे शुल्क आकारणाऱ्या सेतू केंद्राची नोंदणी तात्काळ रद्द करण्याचे निर्देश त्यांनी संबंधितांना दिले आहेत.