प्रकरण अक्षय पतसंस्थेतील : नामनिर्देशनपत्रात दिली संचालकांनी चुकीची अधिसाक्षप्रशांत देसाई भंडाराभंडारा : लाखनी येथील अक्षय नागरी पतसंस्थेच्या भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. यात नित्याने नवनवे विषय बाहेर येत आहेत. पतसंस्थेच्या अभिकर्त्याने वसुल केलेला नित्यनिधी पतसंस्थेत न भरता लाखनीतील मोठ्या व गरजू व्यापाऱ्यांना व्याजाने वाटला. यावर हजारो रुपयांची कमाई केली. यासोबतच संचालक मंडळाने निवडणुकीसाठी सादर केलेल्या नामनिर्देशन अर्जात अधिसाक्ष चुकीची देवून दिशाभूल केल्याचा प्रकार समोर आला आहे. लाखनी येथील अक्षय नगरी पतसंस्थेत अध्यक्ष वरकड यांच्यासह आठ जणांविरुध्द गुन्हा नोंदविण्यात आलेला आहे. त्यांनी ३३ लाख ९९ हजार ३७० रूपयांची अफरातफर केल्याचा संचालक व पतसंस्थेच्या कर्मचाऱ्यांवर ठपका ठेवण्यात आला आहे. याप्रकरणात चार संचालकांना तात्पुरता जामीन मिळाला आहे. या पतसंस्थेतील अन्य चार कर्मचारी अद्याप फरार आहे. या पतसंस्थेत मोठ्या प्रमाणात पैशाची अफरातफर झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यात आणखी काही बाबींची भर पडली असून ते उघडकीस आले आहे.नित्यनिधीवर हजारोंचे कमविले व्याजपतसंस्थेने घनश्याम सोमेश्वर मुंडेकर व सचिन किसन कुंभरे यांना अभिकर्ता म्हणून नियुक्त केले होते. निंबेकर हा महिन्याच्या १ ते २७ तारखेपर्यंत जमा केलेली रोजची नित्यनिधी खातेदारांच्या खात्यावर जमा न करता ती रक्कम स्वत:च्या खात्यावर जमा करायचा. लाखो रुपयांची ही नित्यनिधी लाखनी येथील मोठ्या व गरजू व्यापाऱ्यांना व्याजाने वाटप करायचा. नागरिकांची जमा केलेली रक्कम केवळ दोन दिवसांसाठी पतसंस्थेत जमा करुन ती सर्व रक्कम २ किंवा ३ तारखेला विड्राल करायचा. अशा या गोरखधंद्यात निंबेकरसह संचालक व कर्मचारी यांचा प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष सहभाग व सहकार्य मिळायचे. नागरिकांच्या या नित्यनिधीवर निंबेकरला महिन्याला २५ ते ५० हजार रुपयांचे व्याज मिळायचे. वास्तविकतेत नित्यनिधी म्हटल्यावर ही सर्व रक्कम पत संस्थेत दररोज जमा होणे गरजेचे आहे. संचालकांनी नामनिर्देशन अर्जात केली दिशाभूलपतसंस्थेची निवडणूक लागली त्यावेळी निवडणूकीसाठी नामनिर्देशन अर्ज दाखल करण्यात आले. यावेळी पतसंस्थेच्या संचालकांनी ‘अधीसाक्ष’ भरले. यात त्या संचालकांनी ते संस्थेचे सभासद असून महाराष्ट्र सहकारी संस्था अधीनियम १९६० चे कलम ७३ (क) (अ) नुसार निवडणूकीसाठी पात्र असून कुठलेही थकबाकी नाही. असे स्वयंस्पष्ट घोषणा केलेली आहे. दरम्यान अध्यक्ष वरकड, उपाध्यक्ष उत्तमराव बावनकुळे, कार्यवाह देवाजी पडोळे, सहकार्यवाह देवराम चाचेरे यांनी पतसंस्थेतून २००४ मध्ये एकूण २२ लाखांचे कर्ज घेतले होते. या कर्जाची परतफेड त्यांनी प्रचलित व्याज दरापेक्षा केवळ ६ टक्के व्याजदराने परत करायचे होते. मात्र निवडणूकीपर्यंत ही रक्कम परत केलेली नव्हती. त्यामुळे ते संस्थेचे थकबाकीदार असल्याने त्यांना निवडणूक लढविता येत नव्हती. मात्र दिशाभूल करुन त्यांनी ही निवडणूक लढविल्याची गंभीर बाब समोर आली आहे. हे कर्ज या संचालकांनी २०१६ मध्ये भरल्याची बाब समोर आली आहे.निवडणुकीसाठी मतदारांची मतदार यादी संस्था तयार करते. संचालकांवर थकीत रक्कम असल्यास यादीत नाव येत नाही. अक्षय पतसंस्थेने तयार केलेली यादी यावरुन कुठल्याही संचालकांवर थकीत रक्कम नसल्याचे सिध्द होते. त्यामुळे निवडणूक प्रक्रिया पार पडली. चारही संचालक थकबाकीदार असल्यास त्यांनी सादर केलेली अधीसाक्ष खोडी असल्याचे आढळून आल्यास त्यांच्यावर फौजदारी कारवाई तथा त्याचे संचालक पद धोक्यात येईल.- विलास देशपांडेसहायक निबंधक लाखनी
नित्यनिधी रक्कम दिली व्यापाऱ्यांना व्याजाने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2017 12:47 AM