आॅनलाईन लोकमतअड्याळ : अड्याळ ग्रामपंचायत तर्फे अड्याळ ग्रामीण रुग्णालयातील समस्यांचे निवेदन राज्याचे आरोग्य मंत्री डॉ. दिपक सावंत यांना देण्यात आल्याची माहिती ग्रामविकास अधिकारी एस.ए. नागदेवे यांनी दिली.अड्याळ ग्रामीण रुग्णालयासाठी येथील समस्या सोडविण्यासाठी अड्याळ ग्रामवासीयांनी अनेकदा मोर्चे काढले, निवेदन दिले. त्यामुळे काही समस्या सुटल्या तर काही आजही तशाच आहेत. त्या पूर्ण व्हाव्या आणि ग्रामस्थांना व परिसरवासियांना त्याचा पुरेपुर लाभ मिळावा यासाठी हे निवेदन दिल्याची माहिती येथील सरपंच जयश्री कुंभलकर यांनी सांगितली आहे.अड्याळ ग्रामीण रुग्णालयातील समस्या म्हणजे ‘खळी टाकली आहे डांबरीकरण बाकी आहे’ म्हणायची सवयच झाल्याचे भासते. या समस्यामुळे येथील काम करणारे कर्मचारी जमेल तेवढे करून मोकळे होतात. परंतु या रिकाम्या पदामुळे या रुग्णालयातील येणाºया रुग्णांना मात्र त्याचा सर्वाधिक त्रास होतो. एका माहिती नुसार आरोग्य मंत्री तथा पालकमंत्री यांना या आधीही येथील समस्याचे पत्र गेल्याची माहिती आहे. परंतु अड्याळ ग्रामीण रुग्णालयातील समस्या ज्या दिवशी पूर्ण सुटतील याबाबत शासंकता व्यक्त होत आहे.अड्याळ ग्रामीण रुग्णालयातील समस्येकडे अधिकारी संबंधित विभाग व खुद्द आरोग्यमंत्री सुद्धा लक्ष देताहेत की दुर्लक्ष करीत आहे हाच मोठा प्रश्न इथे येणाºया रुग्णांना नेहमीच पडतो. येथील समस्या कधी कोणाचे काय करणार याचेही ठरले नसताना सुद्धा त्याचा नाहक त्रास मात्र रुग्णांना सहन करावा लागतो.याच ग्रामीण रुग्णालयात अंदाजे २० दिवसापासून एकच डॉक्टर दिवसरात्रीच्या कामामुळे त्रस्त झाले. लोकमतमध्ये वृत्त प्रकाशित होताच वैद्यकीय अधीक्षक डॉ.पी.जी. कुंभरे ग्रामीण रुग्णालय पवनी यांना तात्पुरत्या सेवेसाठी अड्याळ ग्रामीण रुग्णालयात रूजू झाले.परंतु एका माहितीनुसार डॉ.पी.जी. कुंभरे यांना काही महिन्याआधी प्राथमिक आरोग्य केंद्र खांबा तालुका साकोली या ठिकाणी बदली करण्यात आली होती. अड्याळमधील एक ना अनेक प्रश्न मुख्य असणारे ग्रामस्थांनी सोडवायचे असा प्रश्न संतप्त ग्रामस्थांनी केले आहे.
रुग्णालय समस्यांसाठी मंत्र्यांना साकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2017 12:19 AM
अड्याळ ग्रामपंचायत तर्फे अड्याळ ग्रामीण रुग्णालयातील समस्यांचे निवेदन राज्याचे आरोग्य मंत्री डॉ. दिपक सावंत यांना देण्यात आल्याची माहिती ग्रामविकास अधिकारी एस.ए. नागदेवे यांनी दिली.
ठळक मुद्देग्रामपंचायतचा पुढाकार : रूग्ण आरोग्य सुविधांपासून वंचित