आॅनलाईन लोकमतसाकोली : नागझिरा अभयारण्याला लागून असलेल्या तालुक्यातील ग्राम उमरझरी ते आतेगाव मार्गावर वनविभागाने कोणतीही पूर्वसूचना न देता जेसीबीने खड्डा खोदून मार्ग बंद केल्यामुळे ग्रामीणासमोर शेतशिवारात जाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळे संतप्त ग्रामवासींयांनी सहायक वन संरक्षण सदगीर यांच्या वाहनाचा घेराव केला. यात उमरझरी-आतेगाव गावांचे पुनर्वसन करा, अशी मागणी जि.प. सदस्य नेपाल रंगारी यांनी केली आहे.रंगारी व ग्रामपंचायत पदाधिकारी यांच्या मध्यस्थिने रस्त्यावरचा खड्डा बुजवून मार्ग पूर्ववत सुरू करण्यात आला असून वन विभागाच्या अखत्यारीत गेलेला हा मार्ग पुन्हा केव्हा बंद करण्यात येईल. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतशिवारात जाण्यास बंदी घालण्यात येईल हे प्रश्नाधीन आहे. अभयारण्याचे विस्तारीकरण व वन विभागाच्या कठोर कायद्यामुळे जंगलाल लागून असलेल्या जोर गरीब ग्रामीणांना नवनवीन अडचणींना सामोरे जावे लागत आहे. अभयारण्य हा रोजगाराभिमुख नसून एक अभिक्षाप ठरत असल्याची संत ग्रामीण व्यक्त करीत आहेत.दीड हजार लोकसंख्या असलेली उमरझरी आतेगाव ही गट ग्रामपंचायत असून नागझिरा अभयारण्याला लगत असलेले हे ग्राम आहे. विस्तार हक्क वहीवाटी नुसार उमरझरी ते आतेगाव हा मार्ग दोन्ही गावांना जोडणारा खूप जूना मार्ग आहे. या मार्गाला लगत शेती असून शेतकºयांना व ग्रामीणांना दोन्ही गावामध्ये ये-जा करीता हा मार्ग सोयीवरठरतो. शासनाच्या निधीतूनया या रस्त्यावर सळीकरण व सी.डी. वर्कची कामे सुद्धा करण्यात आली आहेत. दोन्ही गावांना जोडणारा व शेतशिवारात रात्री बे रात्री जाण्याकरिता हा सोयीचा ठरतो. अचानक वनविभागाने ग्रामीणांना कोणतीही पूर्व सूचना न देता. रस्त्याच्या मध्यभागी खड्डा खोदल्याने व मार्ग बंद केल्याने ग्रामीणामध्ये वन विभागाप्रती रोष निर्माण झाला. ग्रामीणांनी ग्रामसभेचे आयोजन करून सहायक वन संरक्षकसदगीरयांना ग्रामसभेत बोलविण्यात आली.जि.प. सदस्य नेपाल रंगारी उपसरपंच वसंता हटवार, ग्रामपंचायत पदाधिकारी यांच्या मध्यस्थीने वनाधिकाऱ्यांची समजूत घालून तोडगा काढण्यात आला व मार्ग पूर्ववत सुरू करण्यात आले.जि.प. सदस्य नेपाल रंगारी यांनी माहिती देताना सांगितले की नागझिरा अभयारण्याच्या विस्तारिकरणामुळे जंगलाला लागून असलेल्या पिटेझरी, आमगाव, खैरी, उमरझरी, आंतेगाव, घानोड, जांभळी खांबा, निप्परटोला, सोनेगाव, उसगाव, ४८ गावाला वन विभागाच्या कठोर कायद्यांमुळे अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.विस्तारीकरणांने रोजगार तर दूर उलट वनाधिकाऱ्यांच्या नवनवीन फतव्यामुळे ग्रामीणावर कायद्याचे उल्लंघन केल्याचे ठपके लावून गुन्हे दाखल करीत असल्याचे चित्र आहे. वन व पर्यटनावर आधारित रोजगार उपलब्ध करून देण्याचे शासनाचे धोरण असले तरी ग्रामीण मात्र या योजनांपासून वंचित आहेत. वनविभाग शासनाच्या रोजगाराभिमुख योजना राबवित नसून ग्रामीणांना वेढीस धरले आहे.ग्रामीणांचे वास्तव्य जंगलाला लागून असल्याने वन्य प्राण्यांमुळे शेतपिकाची नुकसान, हिंसक प्राण्यांच्या हल्ल्याची भिती, वन विभागांच्या कायद्याचे पालन करणे व रोजगारांचा प्रश्न असे अनेक प्रश्न ग्रामीणासमोर आहेत. ग्रामस्थ वनविभागातील कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना सहकार्य करतात. तसेच वनकर्मीयांनी सामाजिक बांधिलकी जोपासत ग्रामीणांना सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा परिषद सदस्य नेपाल रंगारी यांनी केले. जर ग्रामीणांच्या वावरण्याने वनविभागाच्या कार्यात विघ्न पडत असेल तर अभयारण्य जंगललगत असलेल्या गावांचे पुनर्वसन करावे, असे निवेदनही रंगारी यांनी केले.सदर रस्ता हा वन विभागाचा संरक्षण मार्ग असून या रस्त्यावर ग्रामीणांना रहदारी करण्याची मनाई केली आहे. पर्यायी रस्ते असून ग्रामीणांनी पर्यायी रस्त्यावरून रहदारी करावी, असे सहायक मुख्य वनसंरक्षक सदगीर यांनी सांगितले.
उमरझरी-आतेगाव गावांचे पुनर्वसन करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2018 10:20 PM
नागझिरा अभयारण्याला लागून असलेल्या तालुक्यातील ग्राम उमरझरी ते आतेगाव मार्गावर वनविभागाने कोणतीही पूर्वसूचना न देता जेसीबीने खड्डा खोदून मार्ग बंद केल्यामुळे ग्रामीणासमोर शेतशिवारात जाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
ठळक मुद्देवन विभागाच्या कार्यप्रणालीमुळे ग्रामीण त्रस्त : जिल्हा परिषद सदस्य रंगारी यांची मागणी