ऑनलाईन लोकमतभंडारा : गोसीखुर्द पुनर्वसनअंतर्गत दवडीपार या गावांचे ९८ घर सुरबोडी गावांचे ९० घर पाण्यात येत असून आणि सुरबोडी या गावांचे पुनर्वसन करा, असे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.भंडारा जिल्हा आढावा बैठक पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आली. यावेळी आमदार चरण वाघमारे, आमदार बाळा काशिवार, आमदार परिणय फुके, आमदार रामचंद्र अवसरे, जिल्हाधिकारी सुहास दिवसे, जिल्हा पोलिस अधिक्षक अधिकारी विनीता साहु, निवासी उपजिल्हाधिकारी विजय भाकरे, उपजिल्हाधिकारी सुजाता गंधे, मनिषा दांडगे व उपविभागीय अधिकारी उपस्थित होते.पालकमंत्री पुढे म्हणाले की, गोदुर्ली व पलाडी या गावातील पिकासाठी पाण्याची गरज आहे त्यासाठी गावाच्या बाजुला पाणीसाठी उपसा सिंचन करा आणि या गावाला पाणी द्या, असे निर्देश पालकमंत्री यांनी दिले. कुलझले या शेतकऱ्यांची गोसीखुर्दच्या कॅनॅलमध्ये २१ गुठे जमिन गेली असून या शेतकऱ्यांनी मागणी मोबदला द्यावा असेही ते म्हणाले.जिल्हा खनिकर्म प्रतिष्ठान समिती ही जिल्ह्यातील खनिज बाधीत क्षेत्राच्या विकास व कल्याण करण्याकरीता खाणबाधीत क्षेत्रामध्ये व खाणकृतीमुळे तेथील जनतेवर झालेले पर्यावरण, आरोग्य, सामाजिक व आर्थिक परिस्थितीवरील आघात कमी करणे व त्यावर उपाय योजन करणे तसेच दिर्घ मुदतीचे शाश्वत उपजिविकेचे साधन उपलब्ध करुन देण्यासाठी विविध प्रकल्प कार्यक्रम जिल्ह्यात राबविणार आहे, असे सांगून सगळ्या आमदारांनी खनिज निधीतून शासकीय योजनामध्ये खर्च करावा व जिल्हयाच्या विकासास हातभार लावावा.आरोग्य, स्वच्छता, पिण्याचे पाणी गडर लाईन, असे काम खनिज विकास कामासाठी निधीतून खर्च करण्याचे आदेश पालकमंत्री यावेळी दिले. यावेळी जिल्हयाच्या विकास कामाचा व मुद्यांचा आढावा घेण्यात आला. यावेळी संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
गावांचे १५ दिवसात पुनर्वसन करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2018 9:20 PM
गोसीखुर्द पुनर्वसनअंतर्गत दवडीपार या गावांचे ९८ घर सुरबोडी गावांचे ९० घर पाण्यात येत असून आणि सुरबोडी या गावांचे पुनर्वसन करा, असे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.
ठळक मुद्देपालकमंत्री : सुरबोडी, दवडीपार येथील गावांचा प्रश्न निकाली आढावा बैठकीत दिले निर्देश