लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्यातील संपूर्ण सिंचन प्रकल्पाचे पाणी धान पिकासाठी सोडण्यात यावे, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हा पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे.भंडारा जिल्ह्यामध्ये १० ते १५ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने संपूर्ण जिल्ह्यात जवळपास ३० टक्के रोवणी रखडली आहे. शेतकऱ्यांचे धानाचे पऱ्हे नष्ट होण्याची स्थिती निर्माण झाली आहे. भंडारा जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पाचे पाणी धानाच्या पºह्यांसाठी व रोवणी झालेल्या धानाच्या पिकासाठी लवकर सोडण्यात यावे, अन्यथा दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांवर ओढावण्याची दाट शक्यता आहे. तसेच जिल्ह्यात होत असलेला विजेचा लपंडाव बंद करण्यात यावी, अन्यथा आंदोलनाचा इशारा निवेदनातून दिला आहे.शिष्टमंडळात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष नाना पंचबुध्दे, प्रदेश सरचिटणीस धनंजय दलाल, समाजकल्याण सभापती रेखा ठाकरे, विधान सभा अध्यक्ष शैलेश मयुर, भंडारा तालुकाध्यक्ष नरेंद्र झंझाड, शहर अध्यक्ष नितीन तुमाने, मोहाडी तालुकाध्यक्ष वासुदेव बांते, तुमसर तालुकाध्यक्ष देवचंद ठाकरे, जिल्हा परिषद सदस्य उत्तम कळपाते, जिल्हा परिषद उपाध्यक्ष नंदु कुर्झेकर, लाखनी तालुकाध्यक्ष डॉ. विकास गभणे, सामाजिक न्याय अध्यक्ष रविंद्र वानखेडे, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष राजकुमार माटे, सेवादलचे मुख्य संघटक प्रा. राजपुत, लाखनी शहर अध्यक्ष धनु व्यास, तुमसर शहर अध्यक्ष योगेश सिंगनजुडे, राजु हाजी सलाम, सेवादल अध्यक्ष सुनिल शहारे, पवनी शहर अध्यक्ष यादवराव भोगे, नागेश पाटील, सुरेश बघेल, शैलेश गजभिये, अरुण अबादे, भोला वैरागडे, शेखर (बाळा) गभने, जयेश सिंघानी, छाया गभणे, दयानंद नखाते, रुपेश राऊत आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
पिकांसाठी प्रकल्पाचे पाणी सोडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 04, 2018 9:42 PM
जिल्ह्यातील संपूर्ण सिंचन प्रकल्पाचे पाणी धान पिकासाठी सोडण्यात यावे, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हा पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे.
ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : मागणी पूर्ण न झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेसचा आंदोलनाचा इशारा