भंडारा : कोरोना संसर्गाच्या काळात योग्य आणि अचूक माहिती पोहचविण्याचे काम वृत्तपत्र करीत आहे. ‘लोकमत’ने जनसामान्यांशी निगडित समस्यांना प्राधान्य देत वाचा फोडण्याचे काम केले आहे. योग्यवेळी योग्य भूमिका मांडल्याने लोकमतची विश्वासार्हता कायम आहे. कोरोना संसर्गाच्या काळात संचारबंदीने प्रत्येक जण घरीच आहे. जागतिक आरोग्य संघटननेसुद्धा वृत्तपत्रामुळे कोरोना होत नसल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे आज लोकमतचे घराघरात स्वागत होत असून अचूक माहितीसाठी विश्वासाचे माध्यम म्हणन बघितले जाते.
जागतिक आरोग्य संघटनेने वृत्तपत्रामुळे कोरोना होत नसल्याचे आधीच स्पष्ट केले आहे. त्यामुळे नियमितपणे वृत्तपत्र बोलावून वाचण्यास काहीच हरकत नाही. लोकमतने कोरोना संसर्गाबाबत अचूक व सविस्तर माहिती देत वाचकांमध्ये आपुलकीची भावना निर्माण केली. लोकमत वाचल्याशिवाय वाचकांनाही परिपूर्ण वाटत नाही. आजही दिवसाची सुरुवात वृत्तपत्र वाचनाने होते.
-डाॅ. निखिल डोकरीमारे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक
कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत जनमानस भयभीत झाले आहेत. मात्र अशा काळात लोकमतने वाचकांना वस्तुनिष्ठ बातम्या देण्याची आपली परंपरा कायम ठेवली आहे. संचारबंदीच्या काळात सर्वसामान्यांच्या समस्या आणि कोरोना बाधितांचे प्रश्न सातत्याने मांडण्यात येते. वृत्तपत्र वाचनाशिवाय दिवसाची सुरुवात होऊच शकत नाही. मी नियमित लोकमत वाचतो.
-प्रदीप काठोळे, जिल्हा समन्वयक अधिकारी माविमं
संकटकाळात लोकमतने नेहमीच नागरिकांना प्रेरणा दिली आहे. प्रशासनाला सहकार्याचे बळ दिले आहे. परिणामी लोकमतने नागरिकांच्या मनात विश्वास निर्माण केला आहे. कोरोना संसर्गाच्या काळात वृत्तपत्रावरही संशय निर्माण झाला. मात्र जागतिक आरोग्य संघटनेपासून सर्वच जण वृत्तपत्र वाचनाने कोरोना होत नाही असे सांगतात. मी नियमितपणे लोकमत वाचन करतो.
-अविनाश कोटांगले, तालुका कृषी अधिकारी भंडारा