लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : तुमसर व मोहाडी तालुक्यात पाऊस कमी पडल्याने धानाची रोवणी अनेक शेतकºयांनी केली नाही. अनेक शेतकºयांवर अस्मानी संकट कोसळले. तुडतुडा, मावासारख्या किडीने धान पीक फस्त केले. अशा नुकसानग्रस्त तुमसर व मोहाडी तालुक्यातील ११ पैकी १० मंडळातील शेतकºयांना प्रति हेक्टर १० हजार रूपये नुकसानभरपाई मिळणार असल्याचे आ.चरण वाघमारे यांनी पत्रपरिषदेत सांगितले.मोहाडी तालुक्यातील वरठी मंडळ वगळून करडी, कांद्री, कान्हळगाव, आंधळगाव तर तुमसर तालुक्यातील सिहोरा, नाकाडोंगरी, मिटेवानी, गर्रा, तुमसर या मंडळातील नुकसानग्रस्त शेतकºयांना प्रति हेक्टर १० हजार रूपयांची आर्थिक मदत शासनाकडून दिली जाणार आहे. सदर क्षेत्र विमा दाव्याकरिता पात्र आहेत. विमा नियमानुसार ३१ जुलैपर्यंत दोन्ही तालुक्यात ७० टक्के रोवणी झाली नाही. पीक कर्ज घेणाºया शेतकºयांना २ टक्के व शासनाने ९८ टक्के रक्कम भरून शेतकºयांचे पीक विमा काढला आहे. पीकविमा नियमानुसार ३१ जुलैपर्यंत पिकांची लागवड न झाल्यास पीक विमा देय असून या नियमात येथील शेतकरी बसतात.जिल्हाधिकाºयांनी धान पिकांचे नुकसानीचे सर्व्हेक्षण करून अहवाल सादर करण्याचे निर्देश तलाठी व कृषी सहायकांना दिले आहे. शेतकºयांनी पिकांचे नुकसानग्रस्त शेताचे फोटो व निवेदन तलाठी व कृषि सहायकांकडे सादर करावे. अंतिम आणेवारी येईल, तेव्हा त्यावर आक्षेप नोंदवावा. तुमसर व मोहाडी तालुक्यात सिंचनाच्या सोयी उपलब्ध असूनही प्रकल्पात पाणी नाही. त्यामुळे शेतकºयांनी वेळेवर धान रोवणी केली नाही. आॅगस्ट महिन्यात व शेतकºयांच्या हातचे पीक गेले. ही वस्तुस्थिती असल्याचे सांगितले.बावनथडी प्रकल्प पूर्णत्वाच्या मार्गावर असून २०१४ पासून राज्य शासनाने २०० कोटी रूपये दिले आहे. प्रधानमंत्री सुक्ष्म सिंचन योजनेत या प्रकल्पाचा समावेश करण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात ५०० हेक्टर जमिनीला सुक्ष्म सिंचन होणार आहे. तुमसर बाजार समितीत शेतकरी प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्यात येणार आहे. प्रधानमंत्री आवास योजनेत तुमसर तालुक्यात १,५१७ तर मोहाडी तालुक्यात ३९१ घरकुलांना मंजुरी देण्यात आली. तुमसर व मोहाडी तालुक्यात प्रशासकीय इमारत होणार असल्याचे सांगितले. पत्रपरिषदेला तालुकाध्यक्ष राजेश पटले, बाबु ठवकर उपस्थित होते.
शेतकºयांना मिळणार नुकसानभरपाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2017 12:17 AM
तुमसर व मोहाडी तालुक्यात पाऊस कमी पडल्याने धानाची रोवणी अनेक शेतकºयांनी केली नाही. अनेक शेतकºयांवर अस्मानी संकट कोसळले.
ठळक मुद्देचरण वाघमारे : तुमसर-मोहाडी तालुक्यातील शेतकºयांचा समावेश