लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : राज्य, राष्ट्रीय महामार्ग तथा तुमसर शहराचा प्रवेशद्वार असलेल्या खापा चौफुलीवरील सीसीटीव्ही कॅमेºयाची दूरवस्था झाली आहे. तिसरा डोळा येथे निकामी करण्यात आल्याची माहिती आहे. सर्व घटना कॅमेºयात कैद होत नसल्याने काहींचे येथे फावले आहे. प्रवेशद्वारावरील सीसीटीव्ही बंद असताना ते दुरुस्त करण्याच्या हालचाली दिसत नाही.तुमसर शहरात प्रवेश करणारा तथा राज्य व राष्ट्रीय महामार्गावरील घटना कैद करण्याकरिता खापा चौफुलीवरील सीसीटीव्ही कॅमेरा लावण्यात आला होता. एका उंच लोखंडी खांबावर तो बसविण्यात आला. काही दिवस तो सुरु होता. त्यानंतर त्याची दिशा बदलविण्यात आली. सध्या एक पेटी उघडी पडली आहे. भर चौकातील सीसीटीव्ही बंद पडूनही तो अद्याप दुरुस्ती करण्यात आला नाही हे विशेष.महामार्गावर सीसीटीव्ही असल्याने नियमबाह्य कामे करण्यांचे धाबे दणाणले होते. तिसरा डोळा त्यांना अडथळा होता. त्यामुळे सदर सीसीटीव्ही निकामी करण्यात त्यांचा हात असल्याची चर्चा सुरु आहे. काही दिवसापूर्वी त्याची दिशा बदलविण्यात आल्याची चर्चा होती.सीसीटीव्ही लावण्यासाठी पैसा खर्च करण्यात आला. परंतु प्रमुख उद्देश येथे यशस्वी होत नाही. खापा चौफुलीवरील घटना कॅमेºयात कैद होत नाही अशी माहिती आहे. सदर चौकाच्या प्रमुख चौकात समावेश होतो. कोरोना संचारबंदीत या कॅमेºयाची महत्वपूर्ण भूमिका कामात आली असती. परंतु त्याचे कुणालाच देणेघेणे नाही. सदर चौक सध्या मोकाट आहे. संबंधितांनी दखल घेऊन सीसीटीव्ही सुरु करण्याची गरज आहे.
खापा चौफुलीवरील सीसीटीव्ही कॅमेऱ्याची दूरवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2020 5:00 AM
तुमसर शहरात प्रवेश करणारा तथा राज्य व राष्ट्रीय महामार्गावरील घटना कैद करण्याकरिता खापा चौफुलीवरील सीसीटीव्ही कॅमेरा लावण्यात आला होता. एका उंच लोखंडी खांबावर तो बसविण्यात आला. काही दिवस तो सुरु होता. त्यानंतर त्याची दिशा बदलविण्यात आली. सध्या एक पेटी उघडी पडली आहे.
ठळक मुद्देकॅमेरा बंद पाडल्याची चर्चा : राज्य, राष्ट्रीय, आंतरराज्यीय मार्ग मोकाट