शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

पेरणीची कामे खोळंबली

By admin | Published: July 04, 2015 1:19 AM

मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी आजपर्यत सरासरी ६८.३ टक्के पाऊस अधिक पडला असलातरी भंडारा जिल्ह्यातील १़ लाख ८४ हजार ७७४ हेक्टर क्षेत्रातील पेरणी खोळंबली आहे.

भंडारा : मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी आजपर्यत सरासरी ६८.३ टक्के पाऊस अधिक पडला असलातरी भंडारा जिल्ह्यातील १़ लाख ८४ हजार ७७४ हेक्टर क्षेत्रातील पेरणी खोळंबली आहे. निसर्गाच्या अवकृपेमुळे ही वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. खरीप हंगामासाठी सध्यस्थितीत १३ हजार ८६४ हेक्टर क्षेत्रात पिकाची पेरणी धोक्यात आली आहे़ जिल्ह्यात एक लाख ९८ हजार ६३९ हेक्टर क्षेत्रावर खरीप पिकांची लागवड होत असून, आतापर्यंत केवळ ७ टक्के हेक्टर क्षेत्रात प्रत्यक्ष पेरणी करण्यात आलेली आहे. जिल्ह्यात १७ हजार ३४६ हेक्टर सर्वसाधारण क्षेत्रापैकी १० हजार ६६५ हेक्टर क्षेत्रात भात नर्सरीची लागवड करण्यात आली असून त्याची टक्केवारी ६१ एवढी आहे. यामध्ये भंडारा तालुक्यात १,५८२ हेक्टर, पवनी २,०४८ हेक्टर, मोहाडी २,२७९ हेक्टर, तुमसर ५७४, साकोली १,१२५, लाखांदूर १,६९० तर लाखनी तालुक्यात १,३६७ हेक्टर क्षेत्रात भात नर्सरीची लागवड करण्यात आली. दमदार पावसामुळे शेतकऱ्यांनी १० हजार २११ हेक्टर सर्वसाधारण क्षेत्रापैकी ५ हजार ८६२ हेक्टर क्षेत्रात आवत्याची लागवड करण्यात आलेली आहे. त्याची टक्केवारी ५७ एवढी आहे. यामध्ये सर्वाधिक लागवड लाखनी तालुक्यात असून २,४०८ हेक्टर आहे. भंडारा ९ हेक्टर, पवनी १,९५४, मोहाडी २५, तुमसर निरंक, साकोली १८५ तर लाखांदूर तालुक्यात १,२८१ हेक्टर क्षेत्रात आवत्याची लागवड करण्यात आली. यासह जिल्ह्यात तुर ४,३४७, मुंग ३, तीळ १५, सोयाबिन १,३७६, ऊस १,६०७, हळद ३१२, कापूस ७३.५०, तर भाजिपाल्याची १,७९७ हेक्टरमध्ये लागवड करण्यात आली़ (नगर प्रतिनिधी)