मोहाडी : शेतकऱ्यांच्या हिताचे नसलेले केंद्र सरकारने मंजूर केलेले तीन कृषी कायदे रद्द करण्यात यावे, या मागणीचे निवेदन तहसीलदार मोहाडी यांच्यामार्फत पंतप्रधानांना तालुका राष्ट्रवादी पक्षातर्फे पाठविण्यात आले.
शेतकरी कृषी कायदे रद्द करावेत, यासाठी शेतकरी दोन महिन्यांपासून आंदोलन करीत आहेत. भांडवलदारांचे हित जपणारे ते कायदे आहेत. तसेच गॅस, डिझेल, पेट्रोलच्या दरवाढीचा प्रभाव सर्वसामान्य जनतेवर होत आहे. गरीब- सामान्य लोकांचे बजेट कोलमडले आहे. केंद्र शासनाने ते कृषी कायदे मागे घ्यावे तसेच भाववाढीला लगाम घालावा, अशी मागणी मोहाडी शहर राष्ट्रवादी पक्षाने निवेदनाद्वारे केली आहे.
अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. निवेदन देताना खुशाल कोसरे,शहराध्यक्ष पुरुषोत्तम पात्रे,विजय पारधी,बबलू सैय्यद ,नरेश ईश्वरकर, झगडू बुधे, मनिषा गायधने, प्रवीण साठवणे, मदन गडरीये,संपत भोयर, प्रभाकर नीमजे,सुरेंद्र वंजारी, मनोहर हेडावू, पांडुरंग निखारे, प्रवीण हेडावू, तेश साठवणे, विनोद भोयर, पवन चव्हाण, जयपाल खोकले, रवींद्र बसीने, ज्ञानेद्र आगाशे, तारा हेडावू, अनुप थोटे,मीनीज शेख आदी उपस्थित होते.