शहरं
Join us  
Trending Stories
1
चंद्रचूड यांचा लास्ट वर्किंग डे संपला! सर्वांना वाकून नमस्कार करत म्हणाले, दुखावला असाल तर माफ करा...
2
"प्रत्येक गड-किल्ल्यावर मशीद असायला हवी..."; काँग्रेस खासदाराची राज ठाकरेंवर टीका
3
शिवरायांचा भगवा झेंडा दरोडेखोरांच्या हातात शोभून दिसत नाही; उद्धव ठाकरे कडाडले
4
रामटेकच्या गडावरून कडेलोट कुणाचा? चौकसे, किरपान, मुळक यांनी वाढविले टेन्शन!
5
"तुमचा शत्रू जमिनीच्या मार्गाने येतोय"; राज ठाकरेंनी कुणाला दिला इशारा?
6
महायुतीचा मुख्यमंत्री कोण?, अमित शाहांनी दिले संकेत; एका विधानानं चर्चांना उधाण
7
Maharashtra Election 2024: "माफी मागा, अन्यथा...", डी के शिवकुमार यांचा महायुतीच्या नेत्यांना इशारा
8
बहिणीच्या लग्नात अनन्या पांडेने का घातला आईचा २१ वर्ष जुना ड्रेस? समोर आलं कारण
9
पृथ्वी शॉचा 'संघर्ष' कायम! मुंबईनेही दाखवला बाहेरचा रस्ता; ऑस्ट्रेलियन दिग्गजाने पत्राद्वारे दिला धीर
10
'महायुतीचे सरकार बनवायचे, देवेंद्र भाऊंना विजयी करायचे'; अमित शाहांनी पहिलीच सभा गाजवली, विरोधकांवर तोफ डागली
11
नजरेत क्रूरता, आवाजात निष्ठूरता.., 'संगीत मानापमान'मधील उपेंद्र लिमयेचं मोशन पोस्टर रिलीज
12
बाबो! 'पुष्पा २' साठी अल्लू अर्जुनने घेतले ३०० कोटी, रश्मिका अन् फहाद फाजिलला मिळाले फक्त...
13
"जातीजातीत समाज विखुरला जावा; SC, ST, OBC समाज एकजूट राहू नये हा काँग्रेसचा डाव"; मोदींचा हल्लाबोल
14
G-NCAP मध्येही खळबळ उडाली! मारुतीच्या नवी डिझायरला ५ स्टार सेफ्टी रेटिंग; टाटाला मोठा धक्का
15
...तर कोकणातील ३ जिल्हे अख्खा महाराष्ट्र पोसू शकतात; राज ठाकरेंचं कळकळीचं आवाहन
16
UPI पेमेंटसाठी इंटरनेटची गरज भासरणार नाही, 'या' फीचरद्वारे लगेच होणार पेमेंट; काय आहे लिमिट?
17
अब्जाधीश उद्योगपती चिरतरूण राहण्यासाठी करतो दररोज १८ तासांचा उपवास, डाएटमध्ये काय-काय?
18
ओळीने फ्लॉप सिनेमे देणारा अभिनेता आता ४१ व्या वर्षी पुन्हा आजमावणार बॉलिवूडमध्ये नशीब
19
SBI Q2 Results : दुसऱ्या तिमाहीत २८% नं वाढला SBI चा नफा, अपेक्षेपेक्षा अधिक; शेअरची स्थिती काय?

रेती माफियांच्या विरोधात ठाणेदारांना निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2019 10:04 PM

गावात एक नव्हे बारा रेतीचे अनधिकृत डम्पिंग यार्ड आहेत. यामुळे गावकऱ्यांची झोपच उडाली असल्याने गुरुवारला ३० मे रोजी दुपारी १२ वाजता गावकरी रेती माफीयांचे विरोधात सिहोरा पोलीस ठाण्यात धडकले. त्यांनी रेतीची चोरी बंद करण्याची मागणी लावून धरली.

ठळक मुद्देकर्कापूरवासीयांची शाब्दिक चकमक : गावकरी आंदोलन करण्याच्या तयारीत

लोकमत न्यूज नेटवर्कचुल्हाड (सिहोरा) : गावात एक नव्हे बारा रेतीचे अनधिकृत डम्पिंग यार्ड आहेत. यामुळे गावकऱ्यांची झोपच उडाली असल्याने गुरुवारला ३० मे रोजी दुपारी १२ वाजता गावकरी रेती माफीयांचे विरोधात सिहोरा पोलीस ठाण्यात धडकले. त्यांनी रेतीची चोरी बंद करण्याची मागणी लावून धरली.सिहोरा परिसरात वैनगंगा, बावनथडी नद्यांचे काठालगत गावात जागोजागी रेतीच डम्पिंग यार्ड आहेत. रेतीचे घाट लिलाव नसतांना नियम धाब्यावर बसवित राजरोसपणे रेतीची चोरी सुरु आहे. नदीचे पात्रात थेट जेसीबी मशीनने रेतीचा उपसा करण्यात येत आहे. नद्यांचे काठावरील गावात तर डम्पिंग यार्डाचे भव्य चित्र निदर्शनास येत आहे. पांजरा गावाचे शेजारी असणाºया वैनगंगा नदीचे पात्रातून रेतीची उपसा करण्यात येत आहे. या रेतीची साठवणूक कर्कापूर गावाचे शिवारात करण्यात येत आहे. या गावात एक नव्हे तब्बल १० ते १२ अनधिकृत डम्पिंग यार्ड आहे. दिवस रात्र रेतीचा उपसा करण्यात येत असल्याने गावकरी घराबाहेर पडतांना भिती बाळगत आहे.ट्रॅक्टर आणि ट्रकचा गावात महापूर आल्याचे चित्र निर्माण होत आहे. या वाहनाचे आवाजाने गावकऱ्यांची झोपच उडाली असून अनेक आजारांना बळी पडण्याची वेळ आली आहे. रेतीमाफीयाचे सोबत रोजची भांडणे गावात सुरु झाली आहे. गावकºयांना माफिया धमक्या देत असल्याने वास्तविक चित्र गावात आहेत. राजकीय पुढारी आणि कार्यकर्ते या माफीयांचे भुमिकेत असल्याने गावकऱ्यांचे ऐकुण घेत नाही.यामुळे संतापलेल्या गावकऱ्यांनी गुरुवारला दुपारी १२ वाजता सरंपच प्रल्हाद आगासे यांचे नेतृत्वात सिहोरा पोलीस ठाणे गाठले. प्रभारी ठाणेदार राजु गायकवाड यांचे सोबत गावकऱ्यांचे शिष्टमंडळाने तब्बल दोन तास चर्चा केली. रेती माफीयांना पोलिसांचे अभय असल्याचा आरोप शिष्टमंडळाने केले. अनधिकृत डम्पिंग यार्ड तथा रेतीची चोरी थांबविण्याची मागणी गावकऱ्यांचे शिष्टमंडळाने लावून धरली. परंतु चर्चा निष्कर्ष पर्यंत पोहचली नाही. वरिष्ठांचे आदेशानंतर रेती चोरी विरोधात कारवाई केली जाणार असल्याचे सांगताच गावकºयांनी धारेवर घेतले. नद्याचे काठावरील गावात तथा मुख्य चौकात पोलीस चौकी मंजुरी करीता उपविभागीय अधिकारी तुमसर यांना ११ जानेवारी ला पोलिसांनी पत्र दिले आहे. परंतु या पत्राची दखल महसूल विभाग दखल घेत नाही. तथा वरिष्ठ अधिकारी साधा ब्र काढत नाही, गावकऱ्यांनी तुमसर बपेरा राज्य मार्गावरील हरदोली गावात रेती माफीया, पोलीस प्रशसन, महसूल विभाग यांचे विरोधात आंदोलनाचा इशारा दिला आहे. करणार असल्याचे सांगितले. या चर्चेत सरपंच प्रल्हाद आगासे, पोलीस पाटील मुकुंदा आगाशे, शैलेश मिश्रा, अंकीत मिश्रा, सोनु आगाशे, सुनील आगाशे, शरद आगाशे, अभय मिश्रा, प्रविण मिश्रा, शुभम आगाशे उपस्थित होते.'तो' पालीस पाटील कोण?पोलीस आणि गावकरी यांच्यात चर्चा सुरु असतांना रेतीचे ट्रक आणि ट्रॅक्टर धारकाकडून एक पोलीस पाटील वसुली करणारा एजंट असल्याचे गावकºयांनी सांगितले. परिसरात या पोलीस पाटील एजंट बाबाची चांगलीच चर्चा आहे. पोलीस पाटलांचा बेधडक व्यवसाय परिसरात सुरु आहे.रेती चोरीच्या कारवाई संदर्भात वरिष्ठांच्या आदेशाचे पालन केले जाईल. त्यांचे निर्देश प्राप्त होताच धडक कारवाईची मोहीम राबविली जाईल.-राजु गायकवाड, प्रभारी ठाणेदार, सिहोरा.येत्या दोन दिवसाचा अल्टीमेटम देण्यात आला आहे. रेती तस्कर व डम्पिंग धारकांचे विरोधात कारवाई करिता रास्ता रोको आंदोलन करणार आहे.-प्रल्हाद आगाशे, सरपंच, कर्कापूर.

टॅग्स :sandवाळूPoliceपोलिस