न्याय मिळणार काय? : जात प्रमाणपत्रांची मागणीसाकोली : भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील आदिवासी बिंझवार (इंझवार) जमातीला जातीचे प्रमाणपत्र मिळत नाही. आदिवासी बिंझवार इंझवार समाजातर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उपविभागीय अधिकारी तलमले यांच्यावतीने जिल्हा परिषद सदस्य अशोक कापगते यांना निवेदन देण्यात आले.या निवेदनानुसार राज्यातील अनुसूचित जमातीच्या यादीत परिशिष्ट २ मध्ये अनुक्रमांक १० वर आदिवासी बिंझवार जमातीचा समावेश आहे.भंडारा, गोंदिया, चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात राहतात. या समाजातील लोक मराठी, हिंदी, छत्तीसगडी भाषा राहणीमानाप्रमाणे बोलतात. महाराष्ट्रात राहणारे लोक मराठी बोलतात म्हणून त्यांना मराठी भाषिक अपभ्रमशातून इंझवार म्हणतात. महाराष्ट्रात एकूण जातीच्या सर्व्हेप्रमाणे इंझवार जातीचा समावेश नाही. ही बाब पडताळून पाहणे तितकेच योग्य आहे. जेणे करून शासनाकडून होणारा गैरसमज दूर होईल की बिंझवार ही जात आहे. इंझवार अशी जातच अस्तित्वात नाही. त्यामुळे आम्हाला आमचा हक्क मिळेल. या अगोदर या जातीला सन २००५ पर्यंत जातीचे प्रमाणपत्र देण्यात येत होते. परंतु आता जातीचे प्रमाणपत्र देणे बंद केले आहे.जर या समाजाला न्याय मिळाला तर शासनाच्या ध्येय धोरणाप्रमाणे हा समाज विकासाकडे वाटचाल करेल. व आपल्या मूलभूत गरजा तसेच आर्थिक सामाजिक शैक्षणिक टप्पा गाठू शकेल म्हणून आदिवासी बिंझवार इंझवार समाजाला जातीचे प्रमाणपत्र देण्यात यावे अन्यथा जन आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही या निवेदनातून देण्यात आला आहे. निवेदन देतेवेळी जिल्हा परिषद सदस्य अशोक कापगते, संघटनेचे उपाध्यक्ष बाबुराव सोनवाने, सचिव अविनास नेवारे व समाजबांधव उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)
आदिवासी समाजाचे मुख्यमंत्र्यांना निवेदन
By admin | Published: October 10, 2015 1:04 AM