लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : मराठा समाजाने आरक्षणा संदर्भात राज्यभर आंदोलन सुरू केले आहे. जवळपास सात लोकांनी आंदोलनादरम्यान आत्महत्या केल्या आहेत. परिणामी मराठा समाज हा आर्थिक दृष्ट्या दुर्बल असून या समाजाला आरक्षण मिळणे नितांत गरजेचे आहे, अशा आशयाचे निवेदन सकल मराठा बांधवांच्यावतीने जिल्ह्यात दाखल झालेल्या पंचायतराज समितीच्या चमूला देण्यात आले.निवेदनात नमूद केल्याप्रमाणे मराठा समाजातील मुलांमध्ये बौद्धीक गुणवत्ता असतानाही शैक्षणिक क्षेत्रात पुढे जाऊ शकत नाही. परिणामी मराठा समाज बांधवांचा शैक्षणिक व आर्थिक विकास थांबलेला आहे. या दृष्टीने मराठा समाजाला आरक्षण मिळणे नितांत गरजेचे आहे. यावेळी पंचायतराज समितीचे प्रमुख आमदार सुधीर पार्वे यांना मराठा क्रांती मोर्च्याच्या वतीने निवेदन देत मागण्यासंदर्भात त्यांच्याशी चर्चा करण्यात आली. निवेदन देण्यापुर्वी मराठा क्रांती मोर्चा व सकल मराठा बांधव जिल्हा शाखा भंडाराच्या वतीने आंदोलनादरम्यान बलिदान देणाऱ्या समाजबांधवांना जिल्हा परिषदेच्या मुख्य गेटवर श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.यावेळी जिल्हा शाखेचे विजय घाडगे, राजेंद्र लिमसे, संजय मोहिते, मंगला कोल्हे, ममता कापसे, अविनाश उन्हाळे, शांता घोरपडे, ज्योती शिंदे, भावना शेळके, सुजाता घाडगे, संजय घाडगे, पूजा पºहाड, प्रकाश कोल्हे, प्रविण कापसे, सुधाकर घोरपडे, वंदना घोडगे, रक्षा शिंदे, अश्विनी घाडगे, हिना घाडगे, सारिका मोरे, शुभांगी कोल्हे, प्रशांत मोरे, स्वप्निल कोल्हे, अर्पणा ढगे, पारूल ढगे यासह अन्य मराठा समाज बांधव उपस्थित होते.
मराठा समाजाच्या आरक्षणासाठी निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 03, 2018 12:55 AM
मराठा समाजाने आरक्षणा संदर्भात राज्यभर आंदोलन सुरू केले आहे. जवळपास सात लोकांनी आंदोलनादरम्यान आत्महत्या केल्या आहेत. परिणामी मराठा समाज हा आर्थिक दृष्ट्या दुर्बल असून या समाजाला आरक्षण मिळणे नितांत गरजेचे आहे, अशा आशयाचे निवेदन सकल मराठा बांधवांच्यावतीने जिल्ह्यात दाखल झालेल्या पंचायतराज समितीच्या चमूला देण्यात आले.
ठळक मुद्देसकल मराठा समाज : आंदोलनातील शहिदांना श्रद्धांजली