चौकशीची मागणी : गुंतवणूकदार व अभिकर्त्यांची फसवणूकतुमसर : जेएसव्ही अभिकर्ता व गुंतवणूकदारांची भंडारा व गोंदिया जिल्ह्यात फसवणूक झाली. याप्रकरणी संबंधित कंपनीविरोधात चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याचे निवेदन आमदार बच्चू कडू यांना देण्यात येणार असल्याची माहिती भागधारक अमित चौधरी यांनी दिली.निवेदनात नमूद केले आहे की, सन २००९ मध्ये जेएसव्ही डेव्हलपर्स इंडिया लिमिटेडची स्थापना भोपाल येथे झाली होती. सन २०१० मध्ये तिचे जाळे भंडारा व गोंदिया जिल्ह्यात पसरले. येथील गोरगरीब जनतेनी अभिकर्त्यांच्या माध्यमातून गुंतवणूक केली. जमा झालेल्या रकमेतून गुंतवणूक केवळ जमिनी घेण्याकरिता केली जाते. परंतु संचालकांनी या पैशाची गुंतवणूक स्वत:ची मालमत्ता तयार करण्यासाठी केली आहे. तर काहींनी जेएसव्हीच्या नावाने लाखोंची मालमत्ता खरेदी केल्या. काहींनी माझ्या व दुसऱ्या एका महिला संचालकावर गुन्हा दाखल केला. काही संचालकांनी अवैधरित्या विक्री केलेल्या समस्त मालमत्तेची रक्कम कंपनी खात्यात जमा न करता स्वत:च्या खात्यात जमा केली. भंडारा येथे प्रॉपर्टीचे खरेदीदारांचे कंपनीच्या खात्यात जमा केली नाही. येथे गुंतवणुकदारांशी मोठा धोका झाला आहे.नियमबाह्यरित्या भूखंड तथा जमिनी विक्री केल्याने शेकडो गुंतवणूकदार व अभिकर्त्यांची येथे फसवणूक झाली आहे. सर्व भूखंड व जमिनी शासनाने जप्त करून या संपूर्ण प्रकरणाची निक्ष्पक्ष चौकशी करून गुंतवणूकदार व अभिकर्त्यांना न्याय देण्याची मागणी निवेदनातून आमदार बच्चू कडू यांना करण्यात येणार आहे. आमदार कडू हे एका कार्यक्रमासाठी शुक्रवारला भंडारा शहरात येत आहे. या संदर्भात जेएसव्ही कंपनीत लाखो रूपयांची गुंतवणूक करणाऱ्या नागरिकांनी व अभिकर्त्यांनी भंडारा येथे उपस्थित राहण्याचे आवाहन अमित चौधरी यांनी केले आहे. (तालुका प्रतिनिधी)
जेएसव्हीप्रकरणी बच्चू कडूंना देणार निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 07, 2017 12:40 AM