संजय साठवणे।लोकमत न्यूज नेटवर्कसाकोली : तलावांचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या भंडारा जिल्ह्यातील जलाशयांवर विदेशी पक्ष्यांच्या आगमनाला सुरुवात झाली असून या पाहुण्यांच्या स्वागतासाठी जलाशय सज्ज झाले आहेत. हॉलंड, फ्रांस, रशिया यासह युरोपीय देशातून आलेल्या पाहुण्या पक्ष्यांनी जलाशय फुलून जातात.भंडारा जिल्ह्यात १३०० च्या वर जलाशय आहेत. हे जलाशय परदेशी पाहुणे पक्ष्यांना दरवर्षी आकर्षित करते. हिवाळ्याला सुरुवात होताच या पक्ष्यांचे आगमन सुरु होते. या पक्ष्यांमुळे जलाशयांचे सौंदर्य फुलून जाते. विदेशातील जलाशय हिवाळ्यात गोठतात. त्यामुळे या प्रदेशातील पक्षी चाऱ्याच्या शोधार्थ भारतात दाखल होतात. भंडारा जिल्ह्यातील विविध तलावांवर या पक्ष्यांची रेलचेल असते. या पक्ष्यांचा अभ्यास करण्याची संधी पक्षी अभ्यासकांना आणि पक्षीमित्रांना उपलब्ध होते.जिल्ह्यात सागर बाड्डा, चिखल्या बाड्डा, शेंदऱ्या बाड्डा, चिमन शेंद्र्या, राजहंस, चक्रवाक, कलहंस, लालशिर गजरा, सोनुला, खैरा बाड्डा आदी पक्ष्यांचे आगमन दरवर्षी होते. सध्या कडाक्याच्या थंडीला प्रारंभ झाला नाही. मात्र तुरळक जलाशयांवर पक्ष्यांचे आगमन होत आहे. यावर्षी १०० टक्के पाऊस झाल्याने जलाशय तुडूंब भरली आहेत. चिला, गादगवत, देवधान, खस, पडार आदी गवती वनस्पतीचे मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे पक्ष्यांना लपण म्हणून त्याचा उपयोग होतो. समशितोष्ण वातावरणात आपल्याडील जलाशय गोठत नाही. गादगवताचे कोंब, देवधान, मासे, शंख, शिंपले, झिंगे, गोगलगाय आदींचा पाहुणे पक्षी खाद्य म्हणून वापर करतात.यावर्षी वाढणार मुक्कामभरपूर पाऊस व विपुल प्रमाणात खाद्य उपलब्ध असल्याने यावर्षी पाहुण्या पक्ष्यांचा मुक्काम मार्चपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. मात्र अलीकडे या पक्ष्यांच्या शिकारीच्या घटनात वाढ झाली आहे. त्यामुळे शासकीय स्तरावर उपाययोजना करण्याची मागणी पक्षीनिरीक्षक विनोद भोवते यांनी केली आहे.
विदेशी पाहुण्या पक्ष्यांसाठी जलाशय सज्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2019 6:00 AM
भंडारा जिल्ह्यात १३०० च्या वर जलाशय आहेत. हे जलाशय परदेशी पाहुणे पक्ष्यांना दरवर्षी आकर्षित करते. हिवाळ्याला सुरुवात होताच या पक्ष्यांचे आगमन सुरु होते. या पक्ष्यांमुळे जलाशयांचे सौंदर्य फुलून जाते. विदेशातील जलाशय हिवाळ्यात गोठतात. त्यामुळे या प्रदेशातील पक्षी चाऱ्याच्या शोधार्थ भारतात दाखल होतात. भंडारा जिल्ह्यातील विविध तलावांवर या पक्ष्यांची रेलचेल असते.
ठळक मुद्देपक्षी मित्रांसाठी पर्वणी : हॉलंड, फ्रांस, रशियातील पक्ष्यांचे आगमन