सोडतीवर अनेकांचे भवितव्य अवलंबून : अधिकारी-पदाधिकारी मुंबईत दाखलभंडारा : जनेतमधून थेट नगराध्यक्ष निवडला जाणार की नगरसेवकांमधून निवड होणार याची चर्चा सुरू असताना थेट नगराध्यक्ष होणार या वृत्तानंतर नगराध्यक्षपद आरक्षणाकडे राजकीय पक्षांसह ईच्छुकांचे लक्ष लागले होते. आज (दि.५) बुधवारला मुंबईत नगराध्यक्षपदासाठी आरक्षण सोडत जाहीर होणार असल्यामुळे काही दिवसांपासून याकडे लागलेल्या नजरा आज ‘कही खुशी कही गम’ मध्ये परीवर्तीत होणार आहे. या सोडतीसाठी जिल्हा प्रकल्प अधिकारी, मुख्याधिकारी व विविध पक्षांचे पदाधिकारी मंगळवारला मुंबईला रवाना झाले आहेत.जिल्ह्यातील भंडारा, तुमसर व पवनी या तीन नगर परिषदांच्या सार्वत्रिक निवडणुका डिसेंबर महिन्यात होणार आहेत. यावेळी नगराध्यक्ष जनतेतून निवडला जाणार असल्यामुळे घोडेबाजाराला ‘ब्रेक’ लागणार आहे. नगराध्यक्षपद जनतेतून असल्यामुळे इच्छा जागृत झाल्यामुळे त्यादृष्टिने अनेकांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. नगराध्यक्षपदासाठी सोडत निघाल्यानंतर मोर्चेबांधणीला वेग येणार आहे. सोबतच काही राजकीय पक्षांना उमेदवारांसाठी शोधमोहीम राबवावी लागणार आहे. भंडारा, तुमसर नगर परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता असून या पक्षात इच्छुकांची यादी लांब आहे. भाजपात सत्ताधारी लोकप्रतिनिधी नगराध्यक्षपदाचा उमेदवार ठरविणार आहेत. त्यामुळे ईच्छुकांनी लोकप्रतिनिधींशी जवळीक साधली आहे. आम्हीच निष्ठावान असल्याचे दाखवित आहेत. नगराध्यक्षपदाची उमेदवारी पदरी पाडून घेण्यासाठी काहींनी ‘डिलिंग’ची तयारी केली आहे. सोयीचे आरक्षण न निघाल्यास या इच्छुकांवर नामुष्की ओढवणार आहे. (जिल्हा प्रतिनिधी)उत्कंठा शिगेलानगराध्यक्षपदासाठी यापूर्वी जुलै महिन्यात आरक्षणाची सोडत निघणार होती. त्यावेळी राजकीय पक्षांसह इच्छुकांच्या नजरा लागल्या मुंबईकडे लागलेल्या होत्या. मात्र तांत्रिक कारणामुळे ही आरक्षण सोडत लांबणीवर पडली होती. आता आरक्षण सोडतीची प्रतिक्षा संपली असून उद्या दुपारी १२ वाजता ही सोडत काढण्यात येणार आहे.आरक्षण अद्याप निश्चित झाले नसले तरी इच्छुकांचे शुभेच्छांचे आपले बॅनर जागोजागी दिसत आहेत. चार वर्षे कधी न दिसणारे नगरसेवक सहा महिन्यांपासून जनसेवेचा आव दाखवित आहेत. वॉर्डाचा फेरफटका मारून समस्या जाणून घेत आहेत.
नगराध्यक्षपद आरक्षणाची आज सोडत
By admin | Published: October 05, 2016 12:36 AM