शहरं
Join us  
Trending Stories
1
"शाहू महाराजांना फोन आला अन् मधुरिमाराजेंनी..."; शेवटच्या १० मिनिटांत घडलेल्या राजकीय भूकंपाचे कारण समोर
2
"...मग पंतप्रधान कशाला होता, मुख्यमंत्री व्हा"; बारामतीतून शरद पवारांचा PM मोदींवर निशाणा
3
त्यांनी बाळासाहेबांचे विचार आणि धनुष्यबाण गहाण ठेवले होते; शिंदेंसाठी CM शिंदेंची बॅटिंग, ठाकरेंवर हल्ला
4
भारताच्या लाजिरवाण्या पराभवाने BCCI 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये; गौतम गंभीरवर होणार प्रश्नांची सरबत्ती
5
UIDAI नं मोफत आधार कार्ड अपडेटची मुदत वाढवली, 'या' तारखेपर्यंत शुल्क लागणार नाही
6
IAS अधिकाऱ्याला मिठाईच्या बॉक्समधून लाच देणं नेत्याला पडलं महागात, पोलीस आले अन्....
7
सर्वोच्च न्यायालयाचा मदरशांना मोठा दिलासा, मदरसा कायदा घटनात्मक घोषित; हायकोर्टाचा निर्णय फिरला
8
राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांवर केलेल्या टीकेला संजय शिरसाट यांचं प्रत्युत्तर; स्पष्टच बोलले
9
भाजपाला मोठा धक्का, अपक्ष निवडणूक लढवत असलेल्या माजी महिला खासदाराचा पक्षाला राम राम
10
“कोल्हापूर उत्तर आम्ही ७ वेळा जिंकली, ७ दिवस भांडलो पण काँग्रेसने जागा सोडली नाही”: संजय राऊत
11
नवाब मलिकांवरून अजितदादा गटाने भाजपा-शिंदे गटाला फटकारलं; "कुणाला काही वाटू दे..."
12
राजेश लाटकर घेणार उद्धव ठाकरेंची भेट! कोल्हापुरात राजकीय घडामोडींना वेग
13
काँग्रेसच्या बालेकिल्ल्यातून यंदा काँग्रेसचेच चिन्ह झाले 'हद्दपार'
14
AUS vs IND : भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा! टीम इंडियासमोर मोठे आव्हान, शिखर धवननं दिला धीर
15
Sameer Bhujbal : दहा अपक्ष उमेदवारांनी माघार घेत समीर भुजबळ यांना दिला पाठिंबा
16
विराट कोहलीसाठी सिक्सर किंग युवीनं शेअर केली खास पोस्ट
17
महाले यांची माघार; भुजबळ, आहेर, गावित ठाम! दिंडोरीत नरहरी झिरवाळ यांना दिलासा
18
Niva Bupa IPO : 'या' दिग्गज हेल्थ इन्शूरन्स कंपनीचा IPO येणार; किंमत किती, कधीपासून करता येणार अर्ज?
19
"मी यापुढे मराठी बोलणार नाही..."; रेल्वे टीसीचा मुजोरपणा, मराठी माणसाला धमकावलं
20
चातुर्मासाची सांगता: कार्तिकी एकादशी कधी आहे? विष्णुप्रबोधोत्सव महात्म्य अन् मान्यता

राजीनामा स्वत:च्या स्वार्थासाठी की जनतेच्या हितासाठी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2018 10:16 PM

२००९ मध्ये आमदारपदाचा राजीनामा देऊन माजी खासदाराने लोकसभेची निवडणूक अपक्ष लढविली. त्यावेळी अपयश आले. त्यामुळे भाजपात प्रवेश केला. भाजपातून निवडून आल्यामुळे खासदार झाले. आता पुन्हा खासदारपदाचा राजीनामा दिला.

ठळक मुद्देमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : साकोलीत भाजपची प्रचारसभा

लोकमत न्यूज नेटवर्कसाकोली : २००९ मध्ये आमदारपदाचा राजीनामा देऊन माजी खासदाराने लोकसभेची निवडणूक अपक्ष लढविली. त्यावेळी अपयश आले. त्यामुळे भाजपात प्रवेश केला. भाजपातून निवडून आल्यामुळे खासदार झाले. आता पुन्हा खासदारपदाचा राजीनामा दिला. त्यावेळी काँग्रेस पक्ष खराब होता तर आता तोच पक्ष पुन्हा चांगला कसा झाला. माजी खासदाराचा राजीनामा हा स्वत:च्या स्वार्थासाठी की जनतेच्या हितासाठी हे आपण आता ठरविले पाहिजे. या पोटनिवडणुकीत राजीनामा नाट्याला पूर्णविराम द्या, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.साकोली येथील होमगार्ड परेड ग्राऊंडवर भाजपचे उमेदवार हेमंत पटले यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीरसभेत बोलत होते. यावेळी ऊर्जामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले, उमेदवार हेमंत पटले, आ. बाळा काशीवार, आ.संजय पुराम, नगराध्यक्ष धनवंता राऊत, सभापती उषा डोंगरवार, जि.प.सदस्य डॉ.नेपाल रंगारी, आ.अनिल सोले, माजी आमदार डॉ.हेमकृष्ण कापगते, दादा टिचकुले, माजी सभापती गीता कापगते, तालुका अध्यक्ष रमेश खेडीकर उपस्थित होते.यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, साकोली तालुक्यातील ‘भेल’ प्रकल्पाचे काम लवकरच सुरू करण्यात येणार आहे. भीमलकसा प्रकल्पाचे काम सुरू झाले आहे. भाजप हा पक्ष सर्वसामान्य जनतेच्या हिताचा येथे लोकहिताची कामे केली जातात.कधी नव्हे तेवढा निधी भंडारा व गोंदिया जिल्ह्याच्या विकासासाठी देण्यात आला आहे. यापुढेही दोन्ही जिल्ह्याच्या विकासाकरिता निधीची कमतरता भासू देणार नसल्याचे सांगितले. सभेचे संचालन भोजराम कापगते यांनी तर आभारप्रदर्शन माजी सभापती गीता कापगते यांनी केले.