शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : सुनावणी आधीच बदलला राष्ट्रवादीच्या कार्यालयाबाहेरील बोर्ड; नेमकं कारण काय?
2
माजी आमदाराला १०० ग्रॅम हेरॉईन विकताना पकडले; कारने पळताना भाच्याने पोलिसालाही उडविले
3
उमेदवारी अर्ज दाखल करायला जाताना भुजबळांचं जोरदार शक्तीप्रदर्शन, हाती घेतला भाजपचा झेंडा; म्हणाले...
4
यशस्वी डाव! वॉशिंग्टनची 'सुंदर' गोलंदाजी; चेंडू कसा वळला ते रचिनसह टॉमलाही नाही कळलं (VIDEO)
5
सीएम ओमर अब्दुल्लांनी घेतली गृहमंत्री अमित शाहांची भेट, कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
6
एक आयडिया आणि आई-मुलाची जोडी ठरली सुपरहिट; वर्षाला करतात ५० लाखांची कमाई
7
अखेर ठरलं! अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा २'ची प्रतीक्षा संपली, डिसेंबरमध्ये 'या' दिवशी प्रदर्शित होणार सिनेमा
8
Gold Silver Rates Today : सोन्या-चांदीच्या तेजीला ब्रेक, १४४२ रुपयांनी स्वस्त झाली चांदी; खरेदीपूर्वी पाहा लेटेस्ट रेट
9
इथे ठाकरे गटाशी युती तोडली, तिथे संभाजी ब्रिगेडचे नेते मनोज जरांगेंच्या भेटीला; चर्चांना उधाण
10
“आदित्य राजकारणात आले, त्याचा जास्त आनंद राज ठाकरेंना झाला”; मनसे नेत्यांनी सांगितली आठवण
11
"लढायचे नाही म्हणाले त्यांनाच उमेदवारी"; भांडूपमध्ये करेक्ट कार्यक्रम झाल्यानंतर मनसे नेत्याचा राजीनामा
12
Ratnagiri Assembly Elections 2024: मशाल पेटणार की, पुन्हा धनुष्यबाण! रत्नागिरीत गणित कसं?
13
आम्ही पवारांना अधिकार दिले, शेकाप सांगोल्याची जागा लढवणार नसेल तर...; जयंत पाटलांची रोखठोक भूमिका!
14
संजय राऊत यांनी आमच्या मतदारसंघाचे तिकीट विकले; पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्याचा गंभीर आरोप 
15
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणातील आरोपीचं झिशान अख्तरशी कनेक्शन; कुटुंबीय म्हणतात...
16
Airtel ची कमाल, 'या' ३ प्लॅन्ससोबत देतेय ५ लाखांपर्यंतचा फ्री इन्शुरन्स; पाहा डिटेल्स
17
"या राज्यात एका जातीच्या बळावर...!", मनोज जरांगे यांचं मोठं विधान; असं जुळवणार राजकीय समीकरण
18
R Ashwin ची टॉप क्लास कामगिरी! नावे झाला WTC च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्सचा रेकॉर्ड
19
Kalyan: भाजप उमेदवार सुलभा गायकवाड यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज
20
दिवाळीत बँका किती दिवस बंद असणार? उसळलीय मोठी गर्दी, शेड्यूल बघून घ्या...

तुमसर हागणदारीमुक्तीचा संकल्प

By admin | Published: March 16, 2016 8:34 AM

तुमसर शहराची स्मार्ट सिटीकडे वाटचाल सुरु असताना स्वच्छतेकडे एक पाऊल पुढे टाकत मुख्याधिकारीसह नगराध्यक्ष तसेच नगरसेवकांनी ...

विशेष आमसभेत ठराव पारित : दोन महिन्यात हागणदारीमुक्त करण्याकरिता मास्टर प्लानतुमसर : तुमसर शहराची स्मार्ट सिटीकडे वाटचाल सुरु असताना स्वच्छतेकडे एक पाऊल पुढे टाकत मुख्याधिकारीसह नगराध्यक्ष तसेच नगरसेवकांनी शहराला हागणदारीमुक्त करण्याचा संकल्प केला व विशेष आमसभेचे आयोजन करून सर्वानुमते तो पारित केला आहे. विशेष म्हणजे सभेत मास्टर प्लान तयार करून दोन महिन्यात शहर हागणदारीमुक्त करण्यावर भर दिला जाईल.तुमसर शहराबाहेर रस्त्यावरील बोरी रोड, कोष्टी रोड, सिहोरा रोड, कटंगी बायपास रोड, देव्हाडी रोड, हनुमानताल रोड, हनुमान तलाव, गांधी सागर तलाव, पिपरा रोड, शिव मंदिर रोड, शिवाजी नगर, येरली रोड वर नागरिक उघड्यावर रस्त्याच्या कडेला शौचास बसत असल्याने शहराबाहेरील घाण शहरात येते. शहर अस्वच्छ होत असल्यामुळे १४ व्या वित्त आयोग तसेच पालिका फंडातून खर्चाची तरतूद करीत मास्टर प्लान द्वारे शहर हागणदारीमुक्त करणार आहेत. त्यात शहरात असलेले सर्व सार्वजनिक शौचालयाची रंगरंगोटी करणे, संपूर्ण शिट लावणे, दारे लावणे, पाणी टंकी लावणे व तिथे इलेक्ट्रीक फिटींग करणे आदी कार्य करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे वैयक्तिक शौचालय अंतर्गत लाभार्थ्यांना १३,००० रुपये अनुदान देण्यात येणार आहे. वैयक्तिक शौचालयाकरिता आतापर्यंत १०३५ लाभार्थ्यांचे अर्ज पालिकेला प्राप्त झाले असून ९८० अर्ज शासनाच्या संकेतस्थळावर अपलोड केले असून ७८० अर्जांना मान्यता मिळाली आहे व लाभार्थ्यांना ६००० रुपयांचा पहिला हप्ताही देण्यात आला आहे. नागरिकांत जनजागृतीकरिता कलापथक जाहिराती, बॅनर, होर्डींग, हँडबिल, पॉम्प्लेट आदींचा वापर करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे शासनाच्या निकषात न बसणारे व शौचालयाची गरज असणाऱ्या नागरिकांना पाच सदस्यीय समितीने पात्र ठरविलेल्या लाभार्थ्यांनाही विशेष बाब म्हणून १३ हजार रुपये शौचालय बांधकामाकरिता देण्यात येणार आहे. दरम्यान एका एजंसीची नेमणूक करून शहरातील लोकांकडे शौचालय आहे किंवा नाही ते तपासून त्यांना शौचालय असल्याचे प्रमाणपत्र देणार आहे. दोन महिन्यानंतर शौचालय असल्याचे प्रमाणपत्र घेतल्याशिवाय कोणतेही दाखले देण्यात येणार नसल्याचा निर्णय घेण्यात आला. प्रत्येकाला शौचालय बांधावेच लागणार असल्याचे मास्टर प्लान तयार करण्यात आले आहे. आजच्या विशेष सभेत नगरसेवकासह विविध संघटनेचे पदाधिकारी, महिला बचत गटाच्या अध्यक्ष, सचिव, शहरातील गणमान्य नागरिकांना उपस्थित राहण्यासंबंधात निमंत्रण पत्रिका पाठविण्यात आलेल्या होत्या. त्यामुळे सभेला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. सभेचे प्रास्ताविक नगराध्यक्ष अभिषेक कारेमोरे यांनी तर आभारप्रदर्शन मुख्याधिकारी चंद्रशेखर गुल्हाणे यांनी केले. (शहर प्रतिनिधी)