भंडारा येथील सामाजिक न्याय भवनात आयोजित राष्ट्रीय मतदार दिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. विधिसेवा प्राधिकरणाचे सचिव नरेश वाळके, उपजिल्हाधिकारी निवडणूक महेश पाटील, उपविभागीय अधिकारी रवींद्र राठोड, तहसीलदार अक्षय पोयाम, नायब तहसीलदार विनोद थोरवे व अधिकारी यावेळी उपस्थित होते. जिल्हाधिकाऱ्यांनी दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन केले.
राष्ट्रीय मतदार दिनाच्या निमीत्याने वृद्ध, तसेच दिव्यांग मतदाराचा सत्कार करण्यात आला. नवीन मतदारांना मतदार छायाचित्र ओळखपत्राचे वाटप करण्यात आले. यावेळी बोलतांना जिल्हाधिकारी म्हणाले की, २५ जानेवारी हा मतदारांचा दिवस असून, या निमित्याने मतदारांमध्ये जागृती येणे गरजेचे आहे. मतदानाच्या हक्कासोबतच नागरिकांनी आपल्या कर्तव्याची जाणीव ठेवणे आवश्यक आहे. मतदानाचा हक्क जाणीवपूर्वक बजावावा. जबाबदारीने मतदान केल्यास अधिक जबाबदार लोकप्रतिनिधी निवडले जातील. यामुळे लोकशाही बळकट होण्यास हातभार लागेल.
विधिसेवा प्राधिकरणाचे सचिव नरेश वाळके यांनी आपल्या भाषणात कायद्यासंदर्भात विवेचन केले. संविधानाच्या उद्देशिकेचे महत्त्व त्यांनी पटवून दिले. योग्य व्यक्ती निवडून यावी, असे वाटत असल्यास नागरिकांनी जबाबदारीने मतदान करणे तितकेच गरजेचे आहे. सुजान नागरिक म्हणून मतदानाच्या कर्तव्याची जाणीव प्रत्येकानी ठेवावी, असे आवाहन त्यांनी केले.
निवडणूक काळात उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकारी कर्मचारी यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. यात नायब तहसीलदार अनिता गावंडे, श्रृती रामटेके व नीतेश सिडाम यांचा समावेश आहे. उत्कृष्ट मतदान अधिकारी म्हणून रोशन घाटबांधे, लहानाबाई राजूरकर व प्रज्ञा पटले यांना गौरविण्यात आले. मतदार दिनाविषयीची सविस्तर माहिती महेश पाटील यांनी प्रास्ताविकातून दिली. उपस्थितांचे आभार उपविभागीय अधिकारी रवींद्र राठोड यांनी मानले.