मांढळ येथील कार्यक्रम : जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षाचा पुढाकार, शौचालय वापर व बांधकामावर भरभंडारा : जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षाने हागणदारीमुक्तीचा ध्यास घेतला आहे. रोजगार हमी योजनेची कामे असो किंवा गावात होणारे कार्यक्रम. कुठल्याही कार्यक्रमातून या कक्षेचे अधिकारी किंवा पथक ग्रामस्थांना मार्गदर्शन करण्यास विसरत नाही किंवा असा कुठलाही दिवस उजाडत नाही. तुमसर तालुक्यातील मांढळ येथील शालेय स्रेहसंमेलनातून उपस्थित ग्रामस्थांना हागणदारीमुक्तीचा संदेश देण्यात आल्याचा अभिनव प्रयोग ग्रामस्थांनी बघीतला. या कार्यक्रमाला उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुधाकर आडे, सरपंच लक्ष्मीकांत सेलोकर, जि.प. सदस्य गिता माटे, पंचायत समिती सदस्य मालिनी वहिले, राजू माटे, माहिती शिक्षण संवाद सल्लागार राजेश येरणे, शाखा व्यवस्थापक उत्तम वाडेकर, सिंधू चौधरी, कृष्णाजी चौधरी, राजेश वहिले, वर्षा चौधरी, रंजना चौधरी, संघमित्रा घोडेस्वार यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. स्नेसंमेलनातून विद्यार्थ्यांचा बौद्धिक विकास घडविण्याबरोबर प्रत्येक कुटुंबाला स्वच्छ सुंदर व गाव हागणदारीमुक्त करण्यासाठी मांढळ येथील महिलांनी पुढाकार घेतला आहे. शौचालयाची उभारणी करुन त्याचा वापर करण्यावर मान्यवरांनी मार्गदर्शन केले. स्वच्छता ही कुटुंबाची खरी गरज आहे. त्यातूनच कुटुंबाचा विकास साधता येईल असाही मानस यावेळी व्यक्त करण्यात आला. यावेळी मुकेश सव्वालाखे, मेश्राम, तंमुस अध्यक्ष वामदेव बारस्कर, विजय अहिरे, अर्जुन ठवकर, वनिता वहिले, बाळकृष्ण पंचबुध्दे, विजय चौधरी, श्रावण गोमासे, फत्तु अहिर, सुरेखा चौधरी, कुंदा गोमासे, उषा बुधे, हिवराज सिंगाडे, यशवंत क्षीरसागर, सुभाष बारस्कर, लतीश सेलोकर, पल्लवी तिडके, पौर्णिमा डुंभरे, वर्षा दहीकर आदी उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)हागणदारीमुक्तीसाठी महिलांचा पुढाकारमांढळ हे गाव हागणदारीमुक्तीच्या वाटेवर आहे. काही शौचालय बांधण्यानंतर गावाला हागणदारीमुक्ती करण्यात येईल. यावेळी गावात प्रत्येक समारंभ कार्यक्रमातून याचा संदेश देण्यात येत आहे. याच औचित्याने स्नेहसंमेलनाच्या व्यासपीठावरुन ग्रामस्थांना हा संदेश देण्यात आला. यावेळी उपस्थित महिलांनी प्रतिसाद देत २० फेब्रुवारीपर्यंत गाव हागणदारीमुक्त करण्याचा संकल्प केला आहे. घर आणि गावांना नवी दिशा दयायची असेल तर कुटुंब समृध्द झाला पाहिजे. त्यासाठी संपत्तीच्या श्रीमंतीपेक्षा विचाराच्या श्रीमंतीने कुटुंबातील बाल मनांवर सुसंस्कार झाले पाहिजे. याकरिता प्रत्येक कुटुंबात स्वच्छतेचे शिपाई तयार व्हायला पाहिजे. गर्दीच्या ठिकाणी महिलांना एखाद्याकडून धक्का लागल्यास पुरुषाचा राग अनावर होतो. महिलांना प्रात:विधीसाठी बाहेर पाठविणाऱ्या कुटुंब प्रमुखांनी त्यांच्या घरची इज्जत जाणार नाही असे कृत्य करु नये. गावात स्वच्छतेचे वातावरण तयार व्हायला पाहिजे. हातात घेतलेला तांब्या यापुढे दिसणार नाही असा पुढाकार आता ग्रामस्थांनी घेण्याचे प्रतिपादन आडे यांनी यावेळी केले आहे. - सुधाकर आडे, उप मुख्य कार्यपालन अधिकारी
स्नेहसंमेलनातून हागणदारीमुक्तीचा संकल्प
By admin | Published: February 14, 2017 12:19 AM