देवानंद नंदेश्वर
भंडारा : जिल्हा परिषद व शासकीय कर्मचारी सहकारी पतसंस्थेसाठी रविवारी झालेल्या निवडणुकीचा निकाल सोमवारी घोषित झाला. यामध्ये भंडारा-गोंदिया जिल्ह्यातून परिवर्तन पॅनलचे सर्वाधिक १७ उमेदवार विजयी झाले. सहकार पॅनलचे दोन आणि स्वाभिमान पॅनलचा एक उमेदवार निवडणुकीत विजयी झाले. या निवडणुकीत परिवर्तन पॅनलने सत्ताधारी सहकार पॅनलचा पतन करून आपली सत्ता प्रस्थापित केली.
विजयी उमेदवारांमध्ये परिवर्तन पॅनलचे संजीव बावनकर, प्रकाश ब्राह्मणकर, मनीष वाहाने, कैलास हांडगे, स्नेहल पडोळे, शालू सावरकर, पांडुरंग नखाते, सुरेश वैद्य, दिनेश घोडीचोर, कोमल चव्हाण, अनिल खंडाईत, विजयकुमार डोये, शंकर चव्हाण, अनमोल मेश्राम, विनोद चौधरी, चंद्रशेखर दमाहे, कन्हैयालाल रहांगडाले, सहकार पॅनलचे रसेश फटे, सुरेश कोरे, स्वाभिमान पॅनलचे केसरीलाल गायधने यांचा समावेश आहे. जिल्हा परिषद व शासकीय कर्मचारी सहकारी पतसंस्था भंडारासाठी एकूण ५५६५ सभासद मतदार होते.