यावेळी मुख्याध्यापिका गीता बोरकर, किरण मेश्राम, सिद्धार्थ मेश्राम, वर्गशिक्षक भीमराव मेश्राम, सहाय्यक शिक्षक विलास कालेजवार, सुभाष कापगते, छबीलाल गिऱ्हेपुंजे, प्रेरणा कंगाले, वैभवी गोमासे, परिचर श्रीराम सार्वे यांच्यासह पालक उपस्थित होते. दहावीच्या परीक्षेत शाळेतील २४ विद्यार्थी प्राविण्यश्रेणीत तर सात विद्यार्थिनी प्रथम श्रेणीत असे एकूण ३१ विद्यार्थ्यांचा निकाल १०० टक्के लागला आहे. या विद्यार्थिनींचा शाळेच्या वतीने पालकांसह सत्कार करण्यात आला. स्नेहा कन्या विद्यालयातील प्रियांशी सिद्धार्थ मेश्राम हिने ९५.६० टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक तर सुहानी संजय रामटेके हिने ९४.६० टक्के गुण मिळवून द्वितीय क्रमांक तर रोहिणी रामदास गिरीपुंजे हिने ९१.४० टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळविला.
या तिन्ही विद्यार्थिनींचा मुख्याध्यापिका गीता बोरकर यांनी त्यांच्या पालकांसह सत्कार केला. यावेळी प्रियांशी मेश्राम हिने पुढे वैद्यकीय शिक्षण घेणार असल्याचे सांगितले. तिन्ही विद्यार्थिनींनी मिळविलेल्या यशामुळे शाळेचा नावलौकीक वाढला असुन इतर विद्यार्थिनींनीही प्रेरणा घ्यावी असे मुख्याध्यापिका बोरकर यांनी सांगितले. यावेळी पालकांनी वर्गशिक्षक तसेच मुख्याध्यापकांनी वर्षभर घेतलेल्या परिश्रमामुळेच हे यश विद्यार्थिनींनी मिळविल्याचे सांगितले.