४५ वर्षांवरील सर्वांनी लस घ्यावी यासाठी तलाठी, आरोग्य कर्मचारी, आशा वर्कर, पोलीस पाटील, सरपंच मंडळी गावात आयोजित केलेल्या लसीकरण शिबिराचा लाभ घ्यावा यासाठी गृहभेट देऊन लोकांना प्रवृत्त करत आहेत. परंतु तरीही लोक अफवांवर विश्वास ठेवून लसीकरणाच्या शिबिराकडे पाठ फिरविताना दिसत आहेत. परंतु भुयारजवळील खापरी या गावात मात्र १०० टक्के पात्र लोकांनी लसीकरण करून एक आदर्श निर्माण केला आहे. भुयार गावातील जनतेचा लसीकरणाविषयी प्रतिसाद पाहता इतर नागरिकांनीही मनात शंका न ठेवता सर्व जनतेने लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन भुयारचे तलाठी एम.एस. सहदेव यांनी केले आहे. पवनीच्या तहसीलदार नीलिमा रंगारी यांनी कोरोनाला रोखण्यासाठी शासनाने ४५ वर्षांवरील वयोगटातील जनतेला मोफत लस देण्याचे ठरविले आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रत्येक पात्र व्यक्तींनी लस घ्यावी, असे आवाहन तहसीलदार नीलिमा रंगारी यांनी पवनी तालुक्यातील जनतेला केले आहे.
खापरी (भुयार)येथे कोरोना लसीकरणाला प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 4:44 AM