लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : एसी दुरूस्तीच्या बहाण्याने घरात प्रवेश करून तिघांवर केलेल्या प्राणघातक हल्ल्यात एका महिलेचा जागीच मृत्यू तर दोघांना कायम अपंगत्व आले आहे. या बहुचर्चित खून खटल्याची अंतिम सुनावणी शुक्रवारला भंडारा जिल्हा व सत्र न्यायालयात होत आहे.तीन वर्षापूर्वी ३० जुलै २०१५ रोजी दुपारी २ वाजताच्या सुमारास म्हाडा कॉलनी येथील रविंद्र शिंदे यांच्या घरी त्यांची मुलगी अश्विनी एकटी असल्याचे पाहून एसी दुरूस्तीच्या बहाण्याने अमिर एजाज शेख आणि सचिन कुंडलीक राऊत या दोन तरूणांनी घरात प्रवेश केला. त्यानंतर तिच्या डोक्यावर लोखंडी हातोडीने वार करून घरातील सोन्याचे दागिणे, लॅपटॉप, एटीएम कार्ड चोरून नेले होते. तेव्हापासून अश्विनीला अपंगत्व आले आहे.याच आरोपीनी त्याच दिवशी रात्री ८ वाजताच्या सुमारास तकीया वॉर्डातील रूपेश बारीया यांच्या घरी एसी दुरूस्तीच्या बहान्याने प्रवेश करून प्रिती बारीया (३०) हिच्या डोक्यावर हातोडीने वार करून जिवानीशी ठार केले. त्याचवेळी तिचा मुलगा भव्य बारीया (९) हा समोर आला असता त्याच्याही डोक्यावर आरोपींनी हातोडीने वार केले. यात तो गंभीररित्या जखमी झाला. बारीया यांच्या घरातून सोने चांदीचे दागिने व ३ लाख २० हजार रूपयांची रोख रक्कम चोरून नेले होते. आरोपींनी शिंदे यांच्या घरून चोरून नेलेल्या एटीएम कार्डचा वापर करून पैसे काढण्याचा प्रयत्न केला. त्यावरून पोलिसांनी या दोन्ही आरोपींना ताब्यात घेऊन पोलिसी हिसका दाखविताच या आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली.याप्रकरणी भंडारा पोलिसांनी भादंवि ३०२, ३०७, ३९७, ४५२ कलमान्वये गुन्हे दाखल केले होते. तपासात आरोपींनी चोरलेले दागिने, रोख रक्कम व गुन्ह्यात वापरलेली हातोडी आरोपीच्या घरून जप्त केली होती. त्यानंतर जिल्हा व सत्र न्यायालयात दोषारोपपत्र सादर करण्यात आले. जिल्हा व सत्र न्यायाधीश संजय देशमुख यांच्या न्यायालयात या प्रकरणाचा खटला सुरू आहे. या आरोपींनी केलेले तिन्ही गुन्हे गंभीर असून सन २०१५ पासून आजपावेतो अशा गुन्ह्याची पुनरावृत्ती भंडारा किंवा गोंदिया जिल्ह्यात घडलेली नाही. त्यामुळे शुक्रवारच्या अंतिम निकालाकडे भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.भव्यला देता आली नाही साक्षप्रीती बारीया खून व भव्य बारीया, अश्विनी शिंंदे मारहाण प्रकरणात सरकारी पक्षाने २५ साक्षदारांचे बयान नोंदविले आहेत. गंभीर दुखापतीमुळे भव्य बारीया याला अर्धांगवायूने ग्रासले आहे. त्यामुळे तो आता बोलूही शकत नाही. याशिवाय घडलेली घटना आठवत नसल्यामुळे तो साक्ष देऊ शकला नाही, असे डॉक्टरांनी तपासणी केल्यावर सांगितल्यामुळे त्याची साक्ष घेण्यात आली नाही.या बहुचर्चित खून खटल्याची अंतिम सुनावणी शुक्रवारला जिल्हा व सत्र न्यायालयात होत आहे. अमिर शेख आणि सचिन राऊत या आरोपींनी दोघांचा खून करून आणि दोघांना शस्त्राने वार करून कायमचे गंभीर जखमी केले. त्यामुळे अश्विनी शिंदे आणि भव्य बारीया यांना कायमचे अपंगत्व आले आहे. त्यामुळे त्यांना आयुष्यभर या वेदना देणाऱ्या आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.अर्जुनीतही केला होता खूनया दोन्ही गुन्ह्यापूर्वी अमिर शेख आणि सचिन राऊत या आरोपींनी १० जून २०१५ रोजी अर्जुनी (मोरगाव) येथील नितू सुरेश पशिने या घरी एकटी असल्याची संधी साधून एसी दुरूस्तीच्या बहाण्याने घरात प्रवेश करून त्यांच्यावर शस्त्राने वार करून ठार केले होते. याप्रकरणाची सुनावणी गोंदिया जिल्हा व सत्र न्यायालयात सुरू आहे.
बहुचर्चित प्रीती बारीया खून खटल्याचा निकाल आज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 07, 2018 11:43 PM
एसी दुरूस्तीच्या बहाण्याने घरात प्रवेश करून तिघांवर केलेल्या प्राणघातक हल्ल्यात एका महिलेचा जागीच मृत्यू तर दोघांना कायम अपंगत्व आले आहे. या बहुचर्चित खून खटल्याची अंतिम सुनावणी शुक्रवारला भंडारा जिल्हा व सत्र न्यायालयात होत आहे.
ठळक मुद्देतीन वर्षापूर्वीची अमानुष घटना : आरोपींनी दोन महिलांचा खून करून दोघांना केली होती बेदम मारहाण