कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. एन. के. बहेकार होते. यावेळी प्रामुख्याने प्रा. ललिता रायचौधरी, प्रा. संध्या वाहने, प्रा. एस.डब्ल्यू. कळंबे, शिक्षकेतर कर्मचारी प्रतिनिधीतर्फे कमलेश लाटा व पंकज मेश्राम उपस्थित होते. प्रा. भारती कावळे यांनी संध्या मेश्राम यांचा जीवन परिचय करून दिला. विस्तार शिक्षण विभागप्रमुख प्रा. नीता खांडेकर, प्रा. वंदना जिभकाटे, प्रा. संगीता सहारे, प्रा. कविता कोळवती, प्रा. ओमप्रकाश नागपुरे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना संध्या मेश्राम या सर्वांपुढे एक आदर्श व्यक्ती असून शिस्तप्रिय, कर्तव्यदक्ष असल्याचे सांगितले. प्राचार्य डॉ. एन.के. बहेकार यांनी शिक्षण सेवेतून जरी आपण निवृत्त होत आहात; पण भावी जीवनात सामाजिक बांधीलकी कायम ठेवून आदर्श जीवन जगण्याची प्रेरणा इतरांना देत राहा, असे मत व्यक्त केले.
प्रा. संध्या मेश्राम यांनी आपल्या ३५ वर्षांच्या प्रदीर्घ कार्यकाळादरम्यान पदवी व पदव्युत्तर महाविद्यालयातील सर्वांचे सहकार्य लाभल्याचे सांगत आभार व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. दिशा गेडाम यांनी केले तर आभार प्रा. ए.पी. कानतोडे यांनी मानले.