लोकमत न्यूज नेटवर्कलाखांदूर : हलक्या व भारी धरणाची पेरणी करताना अनेक शेतकरी पुरेशा पावसाअभावी आधीच वैतागले होते मात्र खरीप हंगामात मध्यंतरी पडलेल्या पावसाने अनेक शेतक?्यांना दिलासा दिला असला तरी परतत्या पावसाने धक्का देत शेतक?्यांची दिवाळखोरी करणारा पाऊस पडल्याने लाखांदुर तालुक्यात शेकडो धान ऊत्पादक शेतकऱ्यांच्या कडपा वाहल्याचे वास्तव आहे.अडीच हजार हेक्टरहुन क्षेञात लाखांदुर तालुक्यात धान पिकाची पेरणी केली जाते. हलक्या व भारी धानाची पेरणी होत असतांना शेतकरी ऊत्पादन मुल्य मिळविण्याच्या नादात कित्येक शेतकरी श्रेणीयुक्त धानाची पेरणी देखील करीत असल्याचे दिसुन आले आहे.यंदाच्या हंगामात पाऊस उशिरा पडला असला तरी शेतकऱ्यांनी हवामानाचा बेत घेत पेरणीपुर्ण पिकाची लावणी केली. लावणीपुर्ण पिक ऊगवले देखील माञ ऊगवणी झाल्यानंतरही कापणी झालेल्या धानपिकाच्या कडपा अचानक पडलेल्या पावसाने पाण्यात भिजल्याचे दिसुन येत आहे.दरम्यान, धान ऊत्पादनात अग्रेसर भंडारा जिल्ह्यात या अवकाळी पावसाने मध्यंतरी तुडतुडा व अन्य कीड रोगाने शेतकरी पुरता हतबल असतांना हातात परतीच्या पावसाने शेतकऱ्यांनी कापलेले धानपीक बुडाल्याने अवघे शेतकरी हतबल ठरले आहे. कृषी विभागासह प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन शेतकऱ्यांना मदत करावी, अशी मागणी शेतकरी जनतेने केली आहे.दुसरीकडे या पावसामुळे भाजीपाला पिकाचेही नुकसान झाले आहे. आधीच भाजीपाल्यांचे भाव गगणाला भिडले असताना परतीच्या पावसामुळे भाववाढ होणार अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. आधीच ढगाळ वातावरणामुळे धानासह तुर पिकावर कीडीचा प्रादूर्भाव वाढला आहे. भारी धान यायला अजून १५ ते २० दिवसांचा कालावधी शिल्लक असताना या समस्येमुळे शेतकऱ्यांसमोर पेचप्रसंग निर्माण झाला आहे.भंडारा, लाखनीतही पावसाची हजेरीजिल्ह्यात सर्वदूर पावसाने हजेरी लावली नसली तरी भंडारा, लाखनी, पवनी व लाखांदूर तालुक्यात हजेरी लावली. जिल्ह्यात मात्र सर्व ठिकाणी ढगाळ वातावरण होते. भंडारा शहरात शनिवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास पावसाला सुरूवात झाली. तब्बल तासभरापर्यंत पाऊस बरसला. दिवाळीचा बाजार तथा अन्य साहित्यांनी बाजारपेठ गजबजली असताना अचानक आलेल्या पावसामुळे अनेकांची तारांबळ उडाली. रविवारी दिवाळी असल्याने शनिवारला मोठ्या प्रमाणात शहरात ठिकठिकाणी झेंडूची फुले विकायला आली होती. आलेल्या पावसामुळे फुल विक्रेत्यांना साहित्य अन्यत्र घेवून जावे लागले. दुसरीकडे ढगाळ वातावरणाचा धानाला चांगलाच फटका बसल्याचे दिसून येत आहे. तूर पिकावर फुल येत असल्याने ढगाळ वातावरणाने फुल गळून पडण्याची भीती व्यक्त होत आहे. तर तुरीवर कीडीचा प्रादूर्भावसुद्धा जाणवत आहे.अड्याळ व परिसरात शनिवारी आलेल्या पावसाने शेकडो शेतकरी चिंताग्रस्त आहेत. कापलेले धान ओलेचिंब झाले आहेत. तर कुणाचे उभे भात पीक झोपले. यामुळे अस्मानी संकटात येथील शेतकरी सापडला आहे.
परतीच्या पावसाने केला शेतकऱ्यांचा घात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2019 6:00 AM
दरम्यान, धान ऊत्पादनात अग्रेसर भंडारा जिल्ह्यात या अवकाळी पावसाने मध्यंतरी तुडतुडा व अन्य कीड रोगाने शेतकरी पुरता हतबल असतांना हातात परतीच्या पावसाने शेतकऱ्यांनी कापलेले धानपीक बुडाल्याने अवघे शेतकरी हतबल ठरले आहे. कृषी विभागासह प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन शेतकऱ्यांना मदत करावी, अशी मागणी शेतकरी जनतेने केली आहे.
ठळक मुद्देबळीराजाचा जीव मेटाकुटीला । धानाच्या कडपा झाल्या ओल्याचिंब