लोकमत न्यूज नेटवर्ककोंढा (कोसरा) : दहा दिवसापुर्वी पवनी तालुक्यातील कोंढा येथून अपहरण झालेल्या दोघांपैकी एकाचा खून झाल्याचे उघडकीस आले असून याप्रकरणी अड्याळ पोलिसांनी वाहन चालकासह चौघांना अटक केली आहे. मृतदेह नागपूर जिल्ह्याच्या मौदा पोलीस ठाण्याच्या हद्दीत आढळून आला.रामकृष्ण भगवान कुर्झेकर (४०) रा. कोंढा असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. विनोद मनोहर गिऱ्हेपुंजे (३०), स्वप्नील भाऊराव गिऱ्हेपुंजे (२५) दोघे रा. मोखारा, तेजराम दगदिश आडे (३०) आणि अमोल गुनाजी कुर्झेकर (२५) दोघेही रा. कोंढा अशी अटकेतील आरोपींची नावे आहे. दोन दिवसापुर्वी रामकृष्णची पत्नी राजेश्री कुर्झेकर हिने अड्याळ पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.१५ आॅगस्ट रोजी रामकृष्ण कुर्झेकर आणि त्यांचा चालक विनोद मनोहर गिºहेपुंजे (३०) रा. मोखारा यांचे कोंढा येथून अपहरण झाल्याचे म्हटले होते. त्यावरून पोलिसांनी अपहरणाचा गुन्हाही दाखल केला. दरम्यान रामकृष्णच्या वाहनाचा चालक विनोद गिऱ्हेपुंजे शुक्रवारी सायंकाळी अड्याळ पोलीस ठाण्यात हजर झाला. त्याने दिलेल्या माहितीवरून रामकृष्णचा खून झाल्याचे उघडकीस आले. पोलिसांनी याप्रकरणी खूनाचा गुन्हा दाखल केला आहे.रामकृष्ण कुर्झेकर यांचा मृतदेह मौदा पोलीस ठाण्याच्या हद्दीत आढळून आला. सुमारे नऊ दिवसापुर्वी त्याचा खून केल्याची प्राथमिक माहिती आहे.आर्थिक देवाण घेवाणीतून हा खून झाल्याची परिसरात चर्चा आहे. १५ ऑगस्ट रोजी रामकृष्ण कुर्झेकर यांचे अपहरण झाले. त्यानंतर आरोपींनी गडेगावजवळील गुंथारा फाट्यावर त्यांच्याच वाहनाखाली चिरडले आणि मृतदेह त्याच वाहनात ठेवून नागपूर जिल्ह्यातील मौदा नजीकच्या जंगलात पोहचले. त्याठिकाणी खड्डा करून मृतदेह पुरला, अशी माहिती आरोपींनी दिल्याचे सांगण्यात आले. दरम्यान या घटनेचा उलगडा होताच पोलिसांनी मौदानजीकचे जंगल शुक्रवारी रात्री गाठून मृतदेह ताब्यात घेतला. अधिक तपास ठाणेदार ढोबळे यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.
अपहरण झालेल्या कोंढा येथील इसमाचा खून झाल्याचे उघड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2019 6:00 AM
रामकृष्ण भगवान कुर्झेकर (४०) रा. कोंढा असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. विनोद मनोहर गिऱ्हेपुंजे (३०), स्वप्नील भाऊराव गिºहेपुंजे (२५) दोघे रा. मोखारा, तेजराम दगदिश आडे (३०) आणि अमोल गुनाजी कुर्झेकर (२५) दोघेही रा. कोंढा अशी अटकेतील आरोपींची नावे आहे.
ठळक मुद्दे१५ ऑगस्टला अपहरण । वाहन चालकासह चौघांना अटक