लोकमत न्यूज नेटवर्कमोहाडी : बेटाळा घाटाच्या स्मशान परिसरात रेतीचा साठा अत्यल्प आहे. तालुक्याच्या महसूल प्रशासनाने जास्त रेतीचा साठा दाखवून लिलाव केला. या प्रकारातून लिलाव कर्त्यांना हक्काने रेती चोरता यावी ही नवी शक्कल महसूल विभागाने लढविली आहे. जणू महसूल प्रशासन रेती चोरांना हातभार लावत असल्याचे सध्या दिसत आहे.मोहाडी तालुक्यात महसूल प्रशासन अनेकांच्या रडावर आहे. अलिकडे तहसील कार्यालयातून दोन लिपीक एसीबीच्या जाळ्यात अडकले. असे असताना महसूल प्रशासनाला कोणताच फरक पडल्याचे दिसत नाही. आता रेती चोरांची साथ देण्यासाठी नवी शक्कल हुडकून काढली आहे. बेटाळा येथील रेती घाटावर स्मशान शेडच्या शेजारी ५० ब्रास पेक्षा कमी रेती साठवणूक करण्यात आली आहे. या रेतीची साठवणूक लिलाव करण्याच्या उद्देशाने जाणीवपूर्वक करण्यात आल्याचा आरोप काँग्रेसचे नेते डॉ.पंकज कारेमोरे यांनी केला आहे. साठा कमी व दहा पट रेतीचा साठा असल्याचे दाखवून लिलाव करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार डॉ.कारेमोरे यांच्या निदर्शनास आला. तालुका महसूल प्रशासनाने ५० ब्रास रेतीचा साठा असताना ४५० ब्रास रेतीसाठा दाखविण्याचा प्रकार केला. या रेतीसाठ्याचा लिलावही करण्यात आल्याचे सांगण्यात आले. रेतीचा साठा कमी असताना जास्त साठा दाखविण्याचा खरा उद्देश लिलाव घेणाऱ्यांना प्रशासनामार्फत हक्काची वाहतूक करता यावी हा असल्याचा आरोप होत आहे. या प्रकरणी तहसीलदारांची चौकशी करावी अशी मागणी आहे.धुमाकूळ कायममोहाडी तालुक्यातील रेतीघाटावर सध्या रेती तस्करांचा मोठा धुमाकुळ सुरु आहे. हजारो ब्रास रेती महसूलच्या डोळ्यादेखत चोरली जात आहे. हा सर्व प्रकार वरिष्ठांना माहित आहे. मात्र राजकीय हितसंबंध आणि अधिकाऱ्यांचे साटेलोटे यातून कुणावरही कारवाई होत नाही. रेती तस्करीचा हा प्रकार कायमचा संपुष्टात आणण्यासाठी सध्यातरी कोणत्याही उपायोयजना होत नाही.रेती तस्करांसाठी उठाठेवमोहाडी तालुक्यातील बेटाळा स्मशानभूमीलगत रेतीचा साठा कमी असताना तो जास्त दाखविण्याचा उठाठेव केवळ रेती तस्करांसाठी करण्यात आला आहे. यात महसूल विभागाचे वरिष्ठ अधिकारीही गुंतल्याचा आरोप डॉ.पंकज कारेमोरे यांनी केला आहे. जिल्हाधिकाºयांनी या प्रकाराची चौकशी करून तात्काळ कारवाई करावी अशी मागणी आहे.
रेती चोरीला महसूलचे पाठबळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2019 1:12 AM
बेटाळा घाटाच्या स्मशान परिसरात रेतीचा साठा अत्यल्प आहे. तालुक्याच्या महसूल प्रशासनाने जास्त रेतीचा साठा दाखवून लिलाव केला. या प्रकारातून लिलाव कर्त्यांना हक्काने रेती चोरता यावी ही नवी शक्कल महसूल विभागाने लढविली आहे.
ठळक मुद्देबेटाळा घाटावरील प्रकार। रेतीसाठा कमी दाखवून रेती चोरण्यासाठी केले रान मोकळे