समस्या जाणल्या : पारदर्शक कामांच्या सूचनालोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : शहरात जिल्हा स्तरावरील विविध कार्यालय असून या कार्यालयामार्फत प्रशिक्षण, कौशल्यवृध्दी, कर्ज काढुुन देवुन त्यांची आर्थिक उन्नती करण्यासाठी निधी दिल्या जाते व त्यांची अंमलबजावणी करावी यासाठी या कार्यालयाची मुख्य भूमिका महत्वाची ठरते. या कार्यालयांना आमदार चरण वाघमारे यांनी भेट दिली.आज सहाय्यक समाज कल्याण आयुक्त कार्यालय भंडारा येथील प्रशासकीय इमारतीमध्ये महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ, वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ, मर्यादित, साहीत्य रत्न लोकशाहीर अन्नाभाऊ साठे विकास महामंडळ, मर्यादित, संत रोहीदास चर्मउद्योग व चर्मकारी विकास महामंडळ, मर्यादित, महाराष्ट्र राज्य अपंग वित्त विकास महामंडळ, महाराष्ट्र राज्य इतर मागास वर्गीय वित्त विकास महामंडळ, तसेच जात वैद्यता पडताळणी समिती भंडारा जिल्हा या कार्यालयांना व अधिकारी कर्मचाऱ्यांना भेटी देवून कार्यालयामार्फत चालवण्या जाणाऱ्या विविध योजनेचा आढावा घेतला. तसेच समाजकल्याण विभागामार्फत त्या परिसरात चालणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबडेकर, अभ्यास केंद्राला सुध्दा भेटी देवुन अभ्यासवर्गातील विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या सोई सविधा व शासनाकडुन ज्या आढावा घेवुन विद्यार्थ्यांशी चर्चा केली.
विकास महामंडळाच्या कार्यालयांचा आढावा
By admin | Published: June 02, 2017 12:29 AM