लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : हंगामाच्या सुरूवातीला पावसाने दडी मारल्याने रोवणीची कामे ठप्प झाली होती. आता जिल्ह्यात दमदार पाऊस सुरू असून सततच्या पावसाने रोवणीच्या कामात अडथळा येत आहे. आतापर्यंत एक लाख ८२ हजार हेक्टर क्षेत्रापैकी २९ हजार १२० हेक्टरवर म्हणजे लागवड क्षेत्राच्या १६ टक्के रोवणी आटोपली आहे. पावसाने उसंत घेतल्यास आठवडाभरात उर्वरित रोवणी पूर्ण होईल, अशी आशा आहे.भंडारा जिल्ह्यात दोन लाख तीन हजार ६१६ हेक्टरवर खरीप हंगामात नियोजन करण्यात आले. त्यापैकी एक लाख ८२ हजार हेक्टर क्षेत्र भाताचे आहे. हंगामाच्या सुरूवातीला पावसाने दडी मारली. त्यामुळे जिल्ह्यातील पेरणीची कामे रखडली होती. जिल्ह्यात १२ जुलैपर्यंत केवळ ३.८७ टक्के रोवणी झाली होती. तर ३० जुलैपर्यंत १२ टक्के रोवणी आटोपली होती.दरम्यान २५ जुलैपासून जिल्ह्यात दमदार पावसाला सुरूवात झाली. यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या. रोवणीच्या कामाला वेग आला. मात्र सतत पाऊस पडत असल्यास रोवणीच्या कामात आता अडथळे येत आहे. आतापर्यंत जिल्ह्यात २९ हजार १२० हेक्टरवर रोवणी झाली आहे. आगामी आठवडाभरात जवळपास संपूर्ण रोवणी होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.समाधारकारक पाऊसजिल्ह्यात गत आठवड्यापासून दमदार पाऊस कोसळत आहे. गत २४ तासात ३.२ मीमी पावसाची नोंद झाली असून १ जून ते २ आॅगस्टपर्यंत ४७४.३ मीमी पाऊस कोसळला आहे. या कालावधीत ६६५.४ मीमी पाऊस अपेक्षित आहे. आतापर्यंत पडलेला पाऊस ७१ टक्के आहे. सर्वाधिक पाऊस पवनी तालुक्यात पडला असून ५९१.७ मीमी पावसाची नोंद करण्यात आली आहे.जलसाठ्यात वाढदमदार पावसाने जिल्ह्यातील जलसाठ्यात वाढ झाली आहे. गोसे प्रकल्पाच्या पातळीतही वाढ झाली असून वैनगंगा नदीही तुडूंब भरली आहे. अद्यापर्यंत जिल्ह्यात नदी-नाल्यांना पूर गेला नाही. मात्र नदी-नाले या पावसाने खळखळून वाहू लागले आहे. जिल्ह्यातील भुगर्भातील पाणी पातळीत वाढ झाली असून अनेक गावातील पाणीटंचाई संपूष्टात आली आहे.
भात रोवणी १६ टक्के
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 02, 2019 9:57 PM
हंगामाच्या सुरूवातीला पावसाने दडी मारल्याने रोवणीची कामे ठप्प झाली होती. आता जिल्ह्यात दमदार पाऊस सुरू असून सततच्या पावसाने रोवणीच्या कामात अडथळा येत आहे. आतापर्यंत एक लाख ८२ हजार हेक्टर क्षेत्रापैकी २९ हजार १२० हेक्टरवर म्हणजे लागवड क्षेत्राच्या १६ टक्के रोवणी आटोपली आहे.
ठळक मुद्देजिल्ह्यात ४७४ मिमी पाऊस : २९ हजार १२० हेक्टरवर रोवणी आटोपली