लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : शासन प्रशासनाने बावनथडी प्रकल्प तयार करण्यासाठी तुमसर व मोहाडी तालुक्यातील ज्या मच्छीमार शेतकरी बांधवांच्या शेतजमिनी संपादीत केल्यामुळे मच्छीमार (ढिवर) समाजातील नागरिक प्रकल्पबाधीत झाले. त्यांना शसन प्रशासनाने एक विशेष बाब म्हणून बावनथडी प्रकल्पातील मासेमारीचा हक्क प्रकल्पबाधीत मच्छीमार (ढिवर) समाजाला देण्यात यावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष राजू कारेमोरे यांनी जिल्हाधिकाºयांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.मच्छीमार (ढिवर) समाजातील ज्या शेतकºयांकडे थोडी चतकोर जमीन होती. ती जमीन बावनथडी प्रकल्पाच्या विविध कामांसाठी संपादीत करण्यात आल्याने या समाजातील नागरिक भूमीहीन झाले आहेत. रोजगारासाठी कोणतेच साधन उपलब्ध नसल्याने मच्छीमार बांधवांसमोर रोजागराचा प्रश्न आ वासून उभा ठाकला असून रोजगारासाठी वणवण भटकावे लागत असून रोजगार मिळत नाही.परिणामी पोटाची खळगी भरता येत नाही अशी विपन्नावस्था निर्माण झाली आहे. शासन प्रशासनाने बावनथडी प्रकल्पबाधीत मच्छीमार समाजासाठी नियमानुसार सोयी सवलती व रोजगार उपलब्ध करून देणे आवश्यक असले तरी या समाजाकडे संबंधित यंत्रणेचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याने बावनथडी प्रकल्पबधीत मच्छीमार समाजाला उपेक्षित जीवन जगावे लागत आहे. हे अन्यायकारक असून न्यायवर्तक संगत नाही.बावनथडी प्रकल्पबाधीत मच्छीमार बांधवांसाठी एक विशेष बाब म्हणून मच्छीमार बांधवांना मासेमारीचे योग्य प्रशिक्षण देण्यात यावे, मासेमारीचे आधुनिक साहित्य उपलब्ध करून देणे व बावनथडी प्रकल्पातील मासेमारीचा हक्क फक्त मच्छीमार समाजाला देण्यात यावा. रोजगारासाठी आर्थिक अनुदान अदा करण्यात यावा अशी मागणी आहे.
धरणातील मासेमारीचा हक्क द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 04, 2019 10:58 PM
शासन प्रशासनाने बावनथडी प्रकल्प तयार करण्यासाठी तुमसर व मोहाडी तालुक्यातील ज्या मच्छीमार शेतकरी बांधवांच्या शेतजमिनी संपादीत केल्यामुळे मच्छीमार (ढिवर) समाजातील नागरिक प्रकल्पबाधीत झाले. त्यांना शसन प्रशासनाने एक विशेष बाब म्हणून बावनथडी प्रकल्पातील मासेमारीचा हक्क प्रकल्पबाधीत मच्छीमार (ढिवर) समाजाला देण्यात यावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष राजू कारेमोरे यांनी जिल्हाधिकाºयांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.
ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : मच्छीमार समाजबांधव झाले त्रस्त