राहुल भुतांगे ।आॅनलाईन लोकमततुमसर : मिस सेंट्रल इंडिया फॅशन शो स्पर्धेमध्ये महाराष्ट्र, मध्यप्रदेश, छत्तीसगड, दिल्ली येथून आलेल्या युवतींनी ब्युटी विथ ब्रेनचा उत्कृष्ट प्रदर्शन केले. यात तुमसरच्या रिंकल सोनी यांनी हा अवार्ड जिंकून तुमसरच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.रिंकल मनोज सोनी यांचे प्राथमिक व कनिष्ठ महाविद्यालयीय शिक्षण येथील आर.एस.जी.के. अग्रवाल शाळेतून केले. त्यानंतर तिने वाणिज्य शाखेत पदवी व फॅशन डिझाईनचे शिक्षण घेतले आहे. रिंकलला बालपणापासूनच चित्रपट व अभिनयाची आवड होती.मात्र शिक्षण पूर्ण केल्यावरच पुढे काय करायचे, असे कुटुंबीयांनी सांगितले होते. त्यामुळे रिंकल सोनी यांनी आधी शिक्षण पूर्ण केले. एक वर्षापूर्वी त्यांनी चित्रपट निर्माता अनिल सहाने यांच्या सिनेस्टेप ईन्स्टिट्युट नागपूर येथे प्रवेश घेतला. व जिद्दीच्या बळावर रिंकल सोनी यांनी अवघ्या एक वर्षातच अभिनय कला अवगत करून घेतली. त्यात त्यांना उत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला होता.दरम्यान हॉटेल ओरियंट तैयबा येथे मिस सेंट्रल इंडिया फॅशन शो चे आयोजन करण्यात आले होता. त्यात महाराष्ट्र, मध्यप्रदेश, छत्तीसगड, दिल्ली येथील अनेक तरुणींनी सहभाग घेतला होता. रिंकल सोनी यांनी प्रतिभेच्या बळावर बाजी मारून मिस सेंट्रल इंडियाचा किताब पटकाविला आहे.या स्पर्धेकरिता सिनेसृष्टीतील विविध चित्रपट निर्माते, अभिनेता आणि सिनेतारका यावेळी उपस्थित होते. रिंकल सोनी यांना अद्यापपावेतो चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली नाही. परंतु संधी प्राप्त करून घेण्याकरिता अजूनही त्यांची धावपळ सुरुच आहे. जिद्द व चिकाटीने हे साध्य करून चित्रपटाच्या माध्यमातून तुमसर शहराचे नाव नावारूपाला आणण्याचा मानस त्यांनी ‘लोकमत’जवळ बोलून दाखविला.
रिंकलने रोवला तुमसरच्या शिरपेचात मानाचा तुरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2018 10:42 PM
मिस सेंट्रल इंडिया फॅशन शो स्पर्धेमध्ये महाराष्ट्र, मध्यप्रदेश, छत्तीसगड, दिल्ली येथून आलेल्या युवतींनी ब्युटी विथ ब्रेनचा उत्कृष्ट प्रदर्शन केले.
ठळक मुद्दे‘मिस सेंट्रल इंडिया फॅशन शो’मध्ये भरारी : ‘ब्युटी विथ ब्रेन’चे उत्कृष्ट उदाहरण