लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : गावाचा खरा विकास करायचा असेल तर सर्वप्रथम ग्रामस्थांनी शौचालयाचा नियमित वापर करून कोणीही व्यक्ती उघड्यावर शौचास जाणार नाही, तसेच हात स्वच्छ धुतले नाही तर हाताला लागलेला मळ शरीरात जाऊन रोगाला आमंत्रण मिळेल. म्हणून निरोगी आरोग्यासाठी हात स्वच्छ धुवा, असे आवाहन ग्रामसेवक एस. एस. हातझाडे यांनी व्यक्त केले.भंडारा तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खुटसावरी येथे बुधवारी हात धुवा दिन कार्यक्रम घेण्यात आला. त्या कार्यक्रमात ते बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच विजय वासनिक होते. यावेळी तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष शालिक कोकोडे, तंमुसचे माजी अध्यक्ष पुरूषोत्तम गिरीपुंजे, रविंद्र वासनिक, आशावर्कर सुजाता साखरे प्रामुख्याने उपस्थित होते. सरपंच विजय वासनिक म्हणाले, शिक्षणासह विद्यार्थ्यांना आरोग्याविषयीचे धडे दिल्यास त्यांचे आरोग्य सुदृढ राहण्यास मदत होईल. हे कार्य केवळ शिक्षकांपुरते मर्यादित नसून त्याचे पालन पालकांनी देखील करणे तेवढेच महत्वाचे आहे. गावात व शाळा परिसरात स्वच्छता बाळगण्यासाठी प्रत्येकानी पुढाकार घेतल्यास निरोगी आरोग्याचा स्वप्न साकार होऊ शकतो. या कार्यात सर्वांनी हातभार लावावा, असे आवाहन केले. यावेळी विद्यार्थ्यांच्या शरीरातील अवयवांची पाहणी उपस्थितांनी केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहायक शिक्षिका पुनम राघोर्ते यांनी केले. संचालन शिल्पा कांबळे तर आभार प्रदर्शन मंगला मस्के यांनी केले.
निरोगी आरोग्यासाठी स्वच्छ धुवा हात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2017 11:46 PM
गावाचा खरा विकास करायचा असेल तर सर्वप्रथम ग्रामस्थांनी शौचालयाचा नियमित वापर करून कोणीही व्यक्ती उघड्यावर शौचास जाणार नाही,
ठळक मुद्देएस.एस. हातझाडे यांचे प्रतिपादन : खुटसावरीत हात धुवा दिन