राजू बांते।लोकमत न्यूज नेटवर्कमोहाडी : गर्भार धानाच्या ओंब्या परिपक्व होण्यासाठी पेंच प्रकल्पातील पाण्याची संजीवनी मिळाली. पेंचचे अतिरिक्त पाणी कालव्यातून वाहत असून सूर नदी व गायमुख नदीत पोहचले आहे. नोव्हेंबर मध्येच कोरड्या पडलेल्या सूर नदीला त्या पाण्याचा आधार मिळाला. त्यामुळे सुकलेली सूर नदी पुन्हा प्रवाहित झाली आहे.या वर्षी अत्यल्प पाऊस पडला. दोन खंडात धान रोवणी झाली. अल्प व अपुºया पावसाने धान उत्पादक चिंतेत आहेत. किडींचा प्रादुर्भाव व पाण्याची बोंब यामुळे धानाचे पीक अर्ध्यावर आली आहे. धान गर्भार अवस्थेत येत असताना सिंचनाची आवश्यकता असते. अशा स्थितीत निसर्गाची वक्रदृष्टी बघायला मिळाली. पेंच मधील पाणी सोडण्यात यावे यासाठी शेतकºयांनी ओरड सुरु केली. पण पेंच प्रकल्पात पुरेसे पाणी नाही. एकदाच पाणी मिळेल असे वक्तव्य पेंच प्रकल्पाच्या अधिकाºयांकडून करण्यात येत होते. अखेर आंदोलनाचा इशारा किसान सभा, किसाान गर्जना आदी संघटनेने दिला. तेव्हा कुठे ३ आॅक्टोबर रोजी पेंचचे पाणी सोडले जाईल अशी वर्तमानपत्रात पेंचच्या अधिकाºयांनी जाहिरात दिली. अखेर ३ आॅक्टोबरला पेंच प्रकल्पाचे पाणी कालव्यात आले. दोन अडीच आठवडे कालव्यात पाणी वाहत होते. मुबलक पाणी मिळत होते. त्यामुळे शेतकºयांमध्ये कुठेच बघायला मिळाला नाही. आज स्थितीत धान चांगल्या ओंब्यावर आले आहेत. हलके धान कापणीला आली आहेत. एक मात्र छान झाले. पेंचच्या पाण्याने सूर नदी वाहत आहे. नोव्हेंबर महिन्यातच सूर नदी पूर्णत: कोरडी पडली होती. पिण्याचा पाण् याचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे सूर नदीवर खोडगाव येथे पाणी पुरवठा योजनेजवळ नदीचा प्रवाह वळता करण्यात आला. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी मनोजकुमार सूर्यवंशी, पाणीपुरवठा विभाग यांच्या पुढाकाराने महात्मा ज्योतिबा फुले हायस्कुल मोहगाव देवी, जिल्हा परिषद केंद्रीय पूर्व माध्यमिक शाळा, मोहगाव देवी यांच्या मदतीने खोडगाव नदीवर वनराई बंधारा तयार केला. पाण्याचे दुर्भिक्ष्य नोव्हेंबर महिन्यातच जाणवायला लागले होते. पण, पेंच प्रकल्पाचा पाणी कालव्यातून शेतीत अन् शेतीतला अतिरिक्त पाणी वाट काढत सूर नदीत व गायमुख नदीत पोहचत होते. सूर नदी पुन्हा प्रवाहित झाली.मागील काही दिवसात सूरनदी व गायमुख नदीद्वारे मोठ्या प्रमाणात पाणी वाहत आहे. नदीतील वाया जाणारा पाणी अडविण्यासाठी काही ठिकाणी कोल्हापुरी बंधारे आहेत. पण ते बंधारे केवळ शोभेची वास्तू झाली आहे. एक थेंबही पाणी त्या बंधाºयात अडविले जात नाही. वनराई बंधारे पाणी अडवितात. पाणी जिरवतात. पण या अडविलेल्या पाण्याची तग जास्त दिवस धरून राहात नाही. खोडगाव, मोहगाव पाणीपुरवठा योजना यामुळेच उन्हाळ्याआधी प्रवाहित होत असते. दरवर्षीच पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होत असते. वाया जाणारे पाणी पूर्णत: अडविता आले तर सूर नदी वर्षभर वाहात राहू शकते.
पेंचच्या आधाराने वाहतोय सूर नदीचा प्रवाह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2017 11:45 PM
गर्भार धानाच्या ओंब्या परिपक्व होण्यासाठी पेंच प्रकल्पातील पाण्याची संजीवनी मिळाली. पेंचचे अतिरिक्त पाणी कालव्यातून वाहत असून सूर नदी व गायमुख नदीत पोहचले आहे.
ठळक मुद्देपाणी अडविण्याची गरज : शेतकºयांना मिळाले समाधान