शहरं
Join us  
Trending Stories
1
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
2
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
3
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
4
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
5
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
6
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
7
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
8
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
9
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
10
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
11
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
12
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
13
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
14
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
15
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
16
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
17
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
18
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
19
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
20
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 

नदी शुध्दीकरण उपाययोजना शून्य

By admin | Published: March 22, 2016 12:48 AM

जलस्रोतांचे प्रदूषण हा गुन्हा आहे, असे असले तरी अनेक वर्षांपासून नागनदीचे घाण पाणी वैनगंगा नदीत सोडण्यात येत आहे.

देवानंद नंदेश्वर भंडाराजलस्रोतांचे प्रदूषण हा गुन्हा आहे, असे असले तरी अनेक वर्षांपासून नागनदीचे घाण पाणी वैनगंगा नदीत सोडण्यात येत आहे. दूषित पाण्यामुळे नदीकाठावरील अनेक गावातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. नागनदीचे घाण पाणी रोखण्याची गरज असताना अनेक संघटना, पक्ष, लोकप्रतिनिधीकडून केवळ मागणी केली जात आहे. परंतु आजही उपाययोजना शून्य आहे. याला कारणभूत कोण, याकडे लक्ष न देता २२ मार्च रोजी जागतिक जल दिनानिमित्त वैनगंगा स्वच्छतेसाठी सर्वानीच पुढाकार घेऊन शासन-प्रशासनाला बाध्य करण्याची काळाची गरज निर्माण झाली आहे.भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यात गोसेखुर्द येथे वैनगंगा नदीवर मोठे धरण बांधले आहे. त्यामध्ये पाणी साठविणे सुरु झाले असल्याने पाणी सिंचित राहू लागले आहे. नागपुरातून वाहत येणाऱ्या नागनदीचे घाण पाणी आंभोरा घाटावर वैनगंगा नदीत मिसळते. पाणी गोसे धरणात जाते. नागनदी ही नागपुरातून उगम पावली असून घराघरातील सांडपाणी नागनदीचे पात्रात सोडले जाते. त्याचप्रमाणे नागपुरातील विविध केमीकल कंपन्यांचे वेस्टेज रासायनिक पाणी नागनदीतून वाहत जाऊन वैनगंगेच्या पाण्यात जमा होत आहे. त्यामुळे गोसे धरणातील संपूर्ण जलसाठा दूषित झाला आहे.धरणात पाणी अडविल्यामुळे गोसेखुर्द पासून सुमारे ३०-३५ किलोमीटर भंडारा-कारधापर्यंत वैनगंगा नदी दुथडी पाण्याने भरली राहत आहे. नागनदीचे पाणी मिसळल्यामुळे पाणी दूषित झाले असून पाण्यातून दुर्गंधी येत आहे. पाण्याचा रंग हिरवट काळसर झाला आहे. पवनी व भंडारा येथे नगरपरिषद द्वारा लोकांना पिण्याचे पाण्याचा पुरवठा वैनगंगा नदीतूनच केला जातो. जरी फिल्टर करून पाणी दिल्या जाते तरी पाणी पिताना पाण्याचा वेगळाच वास येतो. एकंदरीत या दूषित पाण्यामुळे लोकांच्या जिवितास धोका निर्माण झाला आहे. कोणत्याही प्रकारचा आजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. नदीकाठावर बरेच गावे आहेत. तेथील महिला पुरुष नदीच्या पाण्यात आंघोळ करतात. त्या दूषित पाण्यामुळे काही लोकांच्या अंगाला खाज सुटणे, अंगावर लालसर चट्टे येणे आदी प्रकार दिसून येत आहेत. ग्रामपंचायतमार्फत याच नदीतील पाणी गावातील लोकांना पिण्यासाठी पुरविले जाते. फिल्टरची खास सोय नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील लोकांना या दूषित पाण्यापासून धोका निर्माण झाला आहे. दूषित पाण्यामुळे प्रत्येकांच्या मनात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. पवनी परिसरात कावीळ रोगाचा प्रादूर्भाव जास्त प्रमाणात दिसत आहे. वैनगंगेच्या पाण्यात नाग नदीचे दूषित घाण पाणी जाऊ न देण्याची खबरदारी घेणे अत्यंत गरजेचे आहे. कारण नागरिकांच्या आरोग्यास दिवसेंदिवस आजाराचा धोका निर्माण होत आाहे. संपूर्ण नदी पात्रातील साचलेले पाणी दूषित झाल्यामुळे मासोळ्यांचे उत्पादन घटले आहे. ढिवर समाज बांधवांच्या रोजगारावर गंभीर परिणाम झाला आहे. लोकनेत्यांची मागणी अन् अधिकाऱ्यांचे प्रवचन !नदीत येणारे नागनदीचे दुषित पाणी स्वच्छ करण्याविषयी वर्षभरापासून लोकनेत्यांकडून मागणी करण्यात येत आहे. तर अधिकाऱ्यांकडून पाणी बचतीसह उपाययोजना करण्याचे प्रवचन देण्यात येत आहे. कन्हान, सुर, बावनथडी, चुलबंद आणि वैनगंगा या पाच नद्यांच्या पाण्याचे पूजन करुन ते वैनगंगा नदीत सोडण्याने पाणी बचत व नदीतील घाण शुध्द होणार नाही. जलप्रतिज्ञा, वैनगंगा स्त्रोत्र पठन केल्याने दूषित पाण्यामुळे होणारे आजार पळणार नाही. पाणी बचत व नदीतील घाण शुध्द करण्यासाठी प्रबळ उपाययोजनेची गरज आहे. अंमलबजावणीनंतरच जिल्हावासीयांना 'अच्छे दिन'ची विश्वासार्हता जाणवेल.