शहरं
Join us  
Trending Stories
1
थोडक्यात वाचलास, माझी सभा झाली असती तर...; प्रीतीसंगमावर अजित पवार-रोहित पवारांची भेट!
2
Raj Thackeray MNS: राज ठाकरे यांचे इंजिन धोक्यात, पक्षाची मान्यता जाणार का?
3
पर्थ कसोटीत ऑस्ट्रेलियाची दाणादाण, टीम इंडिया विजयापासून पाच पावलं दूर
4
Maharashtra Assembly Election Result 2024: आता नवीन सरकार लगेच स्थापन होणे अनिवार्य नाही; राष्ट्रपती राजवटीची शक्यता नाही
5
महायुतीला १३८ जागांवर ५० टक्क्यांहून अधिक मतं, १६ ठिकाणी लाखांचं मताधिक्य, अवाक् करणारी आकडेवारी
6
अदानी समूहाच्या शेअर्समध्ये पुन्हा तेजी; खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: कोणत्या पक्षाचे किती विद्यमान आमदार पराभूत?; ६ आमदाराचे डिपॉझिटही जप्त
8
"विचारधारा वगैरे आता विसरायला हवं"; धक्कादायक निकालानंतर जितेंद्र आव्हाडांचं विधान
9
पराभूत झालो असलो तरी...; विधानसभा निकालानंतर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
10
"देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंना भेटून...", निवडणुकीनंतर अनुपम खेर यांची खास पोस्ट
11
Stock Market Boom : राज्यातील महायुतीच्या 'महा'विजयानं शेअर बाजारात जल्लोष, Sensex-Nifty मध्ये तेजी; Adani चे शेअर्स वधारले
12
Sajjad Nomani: "मी शब्द मागे घेतो, बिनशर्त माफी मागतो"; सज्जाद नोमानींकडून खुलासा
13
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गूड न्यूज; नव्या वर्षात मिळू शकतं मोठं गिफ्ट, १८६% वाढू शकते सॅलरी
14
शेतकऱ्यांसाठी सुखद घटना! निवडणूक संपताच राज्यातील सोयाबीनचे भाव वधारले
15
Maharashtra Assembly Election Result 2024: संख्याबळानुसार मंत्रिपदांचा आग्रह! राज्य मंत्रिमंडळाचा संभाव्य फॉर्म्युला काय?
16
केवळ ₹ ५००० ची SIP सुरू करा; २५ वर्षांनंतर मोजता मोजता थकाल; पाहा कसा काम करेल Step-Up फॉर्म्युला
17
पाेलिसांनाच ‘डिजिटल अरेस्ट’! पोलिस उपायुक्तांच्या पत्रकार परिषदेतील प्रकार, काय घडलं?
18
"दैत्याचं तेच झालं, जे नेहमी होतं"; उद्धव ठाकरेंवर कंगना रणौत यांचे टीकास्त्र
19
मॅपवर दाखविला अर्धवट पूल असलेला रस्ता; कार काेसळली २५ फूट खाली नदीपात्रात, ३ ठार
20
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: मित्रांकडून लाभ होईल, मंगल कार्याची सुरूवात करू शकता!

रस्ता बांधकामात अनियमितता

By admin | Published: March 20, 2016 12:44 AM

मिटेवानी - हरदोली - टाकला ते उसर्रा रस्त्याचे डांबरीकरण सन २०१५ मध्ये करण्यात आले.

८० ऐवजी ४० मिमी बोल्डरचा वापर : जिल्हा परिषद सार्वजनिंक बांधकाम विभागाचा कारभारतुमसर : मिटेवानी - हरदोली - टाकला ते उसर्रा रस्त्याचे डांबरीकरण सन २०१५ मध्ये करण्यात आले. या रस्त्याचे काम करारनाम्यानुसार झाले नाही. ८० एम.एम. बोल्डर ऐवजी ४० एम.एम. बोल्डर घालण्यात आले. एका वर्षातच डांबरीकरण उखडून ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. या संपूर्ण रस्त्याचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे करण्यात आल्याची तक्रार मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांकडे करण्यात आली. परंतु अद्याप चौकशी झाली नाही.मिटेवानी - हरदोली - टाकला ते उसर्रा तीन कि.मी. रस्त्याचे डांबरीकरण सन २०१५ मध्ये करण्यात आले. रस्त्याच्या करारनाम्यात ८० एम.एम. बोल्डर नमूद असून ४० एम.एम. चा बोल्डर वारण्यात आले आहे. खडीकरण व डांबरीकरण कामात तांत्रिकदृष्ट्या साहित्यावर १ लक्ष ७७ हजार रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप तक्रारीतून केला आहे. सदर रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण केवळ एका वर्षापूर्वी करण्यात आले. तरी निकृष्ट दर्जाच्या बांधकामामुळे या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले असून एका बाजूने रस्ता दाबला गेला आहे. रस्त्याची जाडी अत्यंत अल्प असून साईड बुमची कामे अद्याप अपूर्ण आहेत. संबंधित अधिकाऱ्यांनी क्रास चेकिंग खोटी दाखवून शासनाच्या लाखो रूपयांची अफरातफर केली आहे.रस्त्याचे नाव मिटेवानी - हरदोली, टाकला, उसर्रा एवढे लांबलचक करण्यात येऊन मिटेवानी ग्रामपंचायत येथे एजन्सी दाखविण्यात आली आहे. वास्तविक ही एजन्सी हरदोली, टाकला, उसर्रा असायला पाहिजे होती, असे तक्रारकर्त्यांचे म्हणणे आहे. या प्रकरणाची चौकशी केल्यास मोठे घबाड बाहेर येण्याची शक्यता तक्रारकर्ता रविदयाल पटले यांनी वर्तविली आहे. (तालुका प्रतिनिधी)