चिखलयुक्त रस्ता : अपघातांवर शोधला ग्रामस्थांनी उपायमोहदुरा : शेतातील चिखल रस्त्यावर पडून रस्ता पूर्णत: चिखलमय झाला आहे. या मार्गाने दुचाकीने चालविणे जोखमीचे झाले असून पायदळही चालने कठीण झाले आहे. सध्या रोवणीचा हंगाम सुरु आहे. परंतु मोहदुरा परिसरात पाहिजे त्या प्रमाणात पाऊस पडला नाही. अल्पशा पावसाने शेतकरी कसेबसे रोवणी आटोपत आहेत. रोवणीकरिता चिखलासाठी शेतात जास्त पाण्याची गरज असते. अनेक शेतकऱ्यांनी रोवणीचे चिखल करण्याकरिता ट्रॅक्टरचा वापर केला आहे. त्यामुळे चिखल झाल्यानंतर हे ट्रॅक्टर रस्त्याने जातेवेळी त्यांच्या चाकाला लागलेले चिखल रस्त्यावर पडते. त्यामुळे रस्ते पूर्णपणे चिखलमय झाले आहे. या रस्त्यांचा फटका नागरिकांना बसत आहे. रस्त्यावरून प्रवास करताना नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. दुचाकी स्लीप होऊन अनेक किरकोळ अपघात झाले आहे. नागरिकांनी समस्याची दखल घेत हातात फावडे घेऊन व टँकरने पाणी मारून रस्ता साफ केला. यात गजानन पडोळे, भोजराम बावनकुळे, राजेश लांजेवार, शेषराव पडोळे, महेश खराबे, कवडू हरडे, शरद धुर्र्वं, दुर्वेधन शेंद्रे, सत्यभान बोरकर, वासुदेव पडोळे, जागेश्वर पडोळे व नरेश बोंद्रे यांनी सहकार्य केले. (वार्ताहर)
रस्ता ठरला वाहनधारकांसाठी डोकेदुखी
By admin | Published: August 03, 2016 12:35 AM