रामटेक-तुमसर राष्ट्रीय महामार्ग व भंडारा-तुमसर राज्य महामार्ग यांना जोडणाऱ्या रस्त्यावर महामार्ग प्राधिकरणाने रस्ता बांधकाम करताना खोदकाम केले होते परंतु महामार्ग प्राधिकरणाने यावर एका दुकानदाराने आक्षेप घेतल्यानंतर खोदकाम बुजविले. सदर दुकानदाराने ही जागा आपली असल्याचा दावा केला होता. त्यानंतर महामार्ग प्राधिकरणाने भूमिअभिलेख कार्यालयाकडून संबंधित रस्त्याचे दस्तऐवज घेतले. सदर दस्तऐवजात संबंधित जागेची मालकी महामार्ग प्राधिकरणाची आहे असा निष्कर्ष काढला.
त्यामुळे सदर रस्त्याचे बांधकाम लवकरच सुरू करण्यात येईल अशी माहिती राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अभियंत्यांनी दिली.
रस्ता खोदकाम करताना संबंधित विभागाने दुकानदाराने आक्षेप घेतल्यानंतर भूमिअभिलेख कार्यालयाकडून दस्तऐवज जमा केले. त्यापूर्वी महामार्ग प्राधिकरणाने संपूर्ण दस्तऐवज जमा करण्याची गरज होती. दुकानदाराने वडिलोपार्जित जागा वहिवाट असल्याचे कारण पुढे केले होते अशी माहिती आहे.